'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
काही ठिकाणी धमकावून चोरी केली जाते. पण आता अशा घटना उघडकीस येत आहेत, ज्यामध्ये धमकी न देता, कोणतीही जबरदस्ती न करता व्यक्ती आपल्या जवळचे दागिने, पैसे अथवा मौल्यवान वस्तू चोरांना नेऊन देते.
तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे.
बांगलादेशात चोरट्यांनी नवीन पद्धत वापरून लोकांना लुटणं सुरू केलं आहे. यात ते एखाद्या व्यक्तीकडे पत्ता विचारण्यासाठी किंवा इतर कारणाने जातात आणि त्यांच्याकडील सर्व दागिने आणि पैसे लांबवतात. विशेष म्हणजे ती व्यक्तीही आपल्या घरातलं मौल्यवान सामान स्वतः चोरट्यांना देते. चोर ते लुटून किंवा जबरदस्ती करून नेत नाही. चोरटे ज्या औषधाच्या मदतीने अशी गुन्हेगारी कृत्ये करत आहेत, त्याला शैतानी श्वास देखील म्हणतात.
फसवणुकीची नवीन पद्धत
मागच्या काही काळापासून बांगलादेशमध्ये एका औषधाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करून त्यांना लुटलं जात आहे. ज्यामध्ये कागद किंवा एखाद्या वस्तूवर औषध टाकून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिथून जाणाऱ्या लोकांच्या नाकाजवळ ते नेलं जातं. या वासाने काही सेकंदातच व्यक्तीचे भान हरपते. यानंतर तिच्याकडे ठेवलेले दागिने, पैसे किंवा कोणत्याही वस्तू मागितल्या तरी ती व्यक्ती स्वतःहून चोरांना देते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरचा माणूस चोर आहे हे माहीत असूनही ती व्यक्ती आपल्या सर्व किमती वस्तू त्यांच्या हातात ती व्यक्ती देते. नंतर शुद्धीवर आल्यावर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.
डेव्हिल्स ब्रेथ म्हणजे काय?
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, डेव्हिल्स ब्रेथ पावडर आणि लिक्विड या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. याला स्कोपोलामाइन असंही म्हणतात. गुन्हेगारी हेतूने वापरणारे लोक हे औषध कागदावर, कापडावर, हातावर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर लावू शकतात, या वासाने काही काळ ते कोणाच्याही मनावर नियंत्रण मिळवू शकतात. याच्या वापराने केल्या जाणाऱ्या फसवणुकीची प्रकरणं ऐकून बांगलादेश पोलिसांनाही काही समजलं नव्हतं. मात्र कोर्टाच्या आदेशनानंतर सीआयडी चौकशी करण्यात आली आणि त्यात या औषधाचा खुलासा झाला.
धोतऱ्याच्या फुलापासून स्कोपोलामाइन कोण तयार करते?
स्कोपोलामाइन हे मुळात एक सिंथेटिक ड्रग आहे. औषध तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मोशन सिकनेस आणि काही प्रकरणात शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसाठी आवश्यक असलेली औषधं बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.
पण, हे नैसर्गिक नाही. नैसर्गिक बाबी आणि आणि इतर काही साहित्याचा वापर करून कृत्रिमरित्या स्कोपोलामाइन तयार केले जाते. ते द्रव आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात मिळतं.
ते तयार करण्यासाठीचा मुख्य किंवा महत्त्वाचा घटक धोतऱ्याच्या फुलातून मिळतो.
धोतऱ्याचं फूल एक प्रकारचं विष आहे. त्यातील काही भाग काढून कृत्रिमरित्या स्कोपोलामाइन तयार करण्यात येतं.
अंमलीपदार्थ विरोधी विभागाचे मुख्य रासायनिक विश्लेषक डॉ. दुलाल कृष्ण साहा यांच्या मते, "हे औषध कोणत्याही माणसाच्या नाकापासून चार ते सहा इंच अंतरावर नेल्यास त्याच्या श्वासाच्या टप्प्यात येतं. म्हणजेच एखाद्याची फसवणूक करायची असेल तर हे औषध त्याच्या नाकापासून चार ते सहा इंच अंतरावर नेणं आवश्यक आहे."
"श्वासाद्वारे आत गेल्यानंतर 10 मिनिटांच्या आत किंवा त्याच्या आधीच या औषधाचा परिणाम दिसू लागतो. त्यानंतर स्मृती आणि मेंदू सचेतन स्वरुपात काम करू शकत नाहीत. त्याता परिणाम जाऊन पूर्ववत होण्यासाठी काही जणांना एक तास लागतो तर काही लोक तीन-चार तासांनीही पूर्णपणे पूर्ववत होत नाहीत."
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा