'या' गोष्टी गुप्त ठेवा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपल्या जीवनातील काही गोष्टी सर्वांन पासुन गुपित ठेवा.
आजकाल प्रत्येक व्यक्ती च्या जीवनात काही न काही समस्या असतात. या समस्या आपण आपल्या समाजातील लोकांना सांगून आपण आपले च हसे करुन घेत असतो.
कारण समाजातील काही व्यक्ती आपल्या समस्या गंभीर होऊन ऐकतील व नंतर हसुन इतर लोकांना सांगत बसतील, या व्दारे समाजातील आपली प्रतिष्ठा व पत कमी होते.
त्यामुळे आपल्या काही गोष्टी प्रत्येक व्यक्ती ने गुप्त ठेवल्या पाहिजे.
आपली आर्थिक क्षमता:-
प्रत्येक व्यक्ती ने आपल्या घर परिवारा ची आर्थिक क्षमते विषयी कधीही समाजातील व इतर लोकां समोर चर्चा करत बसू नये. त्यामुळे समाजातील लोकांना आपल्या विषयी एक प्रकारे अंदाज बांधता येऊ शकतो.
तुम्ही गरीब, श्रीमंत, किंवा मध्यमवर्गीय असा आपल्या आर्थिक परिस्थिती ची माहिती लोकांना देऊ नका. लोक या महिती चा गैर फायदा घेऊ शकतात.
आपल्या परिवारातील अडचणी:-
आजकाल प्रत्येक परिवारातील सदस्यां चे एकमेकांशी पटत नसते. आपल्या परिवारात अनेक अडचणी किंवा वाद विवाद असतात. या विषयी इतर लोकांशी बोलणं म्हणजे लोकांना आपल्या घरातील गोष्टी माहीत करुन देणे सारखे आहे. या गोष्टी तुमच्या साठी व परिवारा साठी ही हानीकारक आहे.
आपल्या क्षमता:-
प्रत्येक व्यक्ती ने आपल्या कोणत्याही क्षमतां विषयी समाजातील लोकां समोर विनाकारण बडेजाव करने, व्यर्थ बडबड करणे टाळले पाहिजे.
थोडक्यात आपल्या क्षमता समाजात उघड करु नये.
आपल्या योजना:-
प्रत्येक व्यक्ती ने आपल्या योजना विषयी इतर लोकांशी चर्चा करणे चुकीचे आहे. कारण आजकाल प्रत्येक व्यक्ती तुमच्या योजना विषयी सहकार्य करणारा असेलच असे नाही.
त्यामुळे आपल्या पुढच्या योजना विषयी चर्चा करत बसू नका.
आपला इतरांशी असलेल्या वादविवाद विषयी:-
आजकाल स्पर्धा युगात प्रत्येक व्यक्ती चे कोणाशी न कोणाशी वादविवाद किंवा शत्रूत्व असु शकते. त्या विषयी माहिती उघड करत बसू नका. या गोष्टी चा लोकं गैर फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणु शकतात.
आपल्या आजारपणा विषयी:-
आजकाल धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ला काही न काही आरोग्य विषयक समस्या असतात. पण तुम्ही कायम तुमच्या आरोग्य समस्या विषयी माहिती देत बसू नका.
लोकांसाठी ते कंटाळावाणे वाटु शकते. तसेच तुमच्या साठी ते घातक ही होऊ शकते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा