डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

एथर 450S

 इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी एथरने नवीन वर्षात ग्राहकांना भेट दिली आहे. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठं डिस्काउंट देण्याची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.



एथरने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 450S च्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्टूरच्या किंमतीत 20 हजार रुपयांचा डिस्काउंट देतेय.

उपलब्ध माहितीनुसार, कंपनी 450S इलेक्ट्रिक स्कूटरच्या एक्स-शोरुम किंमतीवर 20,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देतेय. डिस्काउंटनंतर स्कूटरची किंमत कमी होऊन 1,09,999 रुपये झाली आहे. या ऑफरची माहिती स्वतः एथर एनर्जीचे सीईओ तरुण गर्ग यांनी दिली आहे.

फूल चार्जमध्ये चालवा 115 किलोमीटर 

एथर 450एस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.9 Kw ची सिंगल लिथियम लिटनियम आयन बॅटरी देण्यात आलीये. ही फूल चार्ज केल्यावर स्कूटर 115 किलोमीटरची रेंज ऑफर करते. या इलेक्ट्रिक स्टूरची टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे. ही केवळ 3.9 सेकंदात 40 किलोमीटर प्रति तासचा वेग पकडते. या स्कूटरमध्ये एलसीडी डिस्प्लेसोबतच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेंशनसारखे अनेक फीचर्स मिळतात.

फीचर्सही आहेत जबरदस्त 

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळणाऱ्या फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये डिजिटल इस्ट्रूमेटं कंसोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक, फोनसाठी चार्जिंग पोर्ट आणि राइड मोड सारखे अनेक फीचर्स मिळतात. यासोबतच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न इंडिकेटर आणि लो बॅटरी इंडिकेटरसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

News credit:

News 18 लोकमत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक