Amazon वर उद्यापासून सुरु होणार सिक्रेट सेल, प्रत्येक वस्तू फक्त 1 रुपयात मिळेल; नेमकी काय आहे ऑफर?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल उद्या 13 जानेवारी रोजी प्राइम यूजर्ससाठी दुपारपासून सुरू होणार आहे. ई-कॉमर्स कंपनीने आधीच विशलिस्ट पेज लॉन्च केले आहे आणि गेट सेल रेडी सेक्शन सादर केलं आहे.
Sample Mania ऑफर काय आहे?
Amazon वरील सॅम्पल मॅनिया सेक्शनमध्ये ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी प्रोडक्टचे सॅम्पल वापरून पाहण्यासाठी दिले जातात. सामान्यतः अॅमेझॉन हे सॅम्पल 99 रुपयांना विकतो. मात्र रिपब्लिक डे सेल निमित्ताने खरेदीदारांना हे सॅम्पल फक्त 1 रुपयात मिळू शकतात. सेल दरम्यान, Amazon दररोज दुपारी 3 वाजता नवीन सॅम्पल सादर करेल, जिथे तुम्हाला 1 रुपयात प्रोडक्टचे सॅम्पल खरेदी करण्याची संधी मिळेल. (Latest Marathi News)
Amazon India वेबसाइटवरील सॅम्पल मॅनिया सेक्शनमध्ये कॉस्मेटिक आणि हेल्थशी संबंधित प्रोडक्टचे सॅम्पल ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत.
13 जानेवारी रोजी ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू झाल्यावर, सेलिंग पेजवर सॅम्पल मॅनिया सेगमेंटला भेट द्या. तुम्हाला हवे आहेत, ते प्रोडक्ट तुम्ही येथे शोधू शकता आणि तुमच्या कार्टमध्ये अॅड करू शकता. कार्ट पेजवर, "Collect one sample" पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाठवलं जाईल. असं असलं तरी अद्यापही ऑर्डर अॅक्टिव्ह झालेली नाही. ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु झाल्यावर ग्राहकांना ही ऑफर पाहायला मिळणार आहे.
News Credit:
Saam Tv
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा