जगातील पहिला ट्रान्सपरन्ट-वायरलेस टीव्ही, एलजीची भन्नाट टेक्नॉलॉजी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जगातील पहिला ट्रान्सपरन्ट-वायरलेस टीव्ही, एलजीची भन्नाट टेक्नॉलॉजी
एलजी ही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स बनवण्यात नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने आपला नवीन टीव्ही नुकताच लाँच केला आहे. कंपनीने CES 2024 म्हणजेच Consumer Electronics Show मध्ये नवीन पारदर्शक (Transparent) टीव्ही लाँच केला आहे.
LG OLED T असे या टीव्हीचे नाव आहे. हा जगातील पहिला पारदर्शक आणि वायरलेस टीव्ही असेल.
एलजी कंपनीने Consumer Electronics Show मध्ये M आणि G सीरीज अपडेट केली आहे. यासोबत पारदर्शक OLED लाँच केला आहे. हा टिव्ही टीव्ही 4K रिझोल्यूशन आणि LG च्या वायरलेस ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानासह लाँच झाला आहे. (Latest News)
टीव्हीची खासियत
या टीव्हीमध्ये कॉन्ट्रॅक्स्ट स्क्रिन देण्यात आली आहे. हा टीव्ही नवीन लेटेस्ट Alpha 11 प्रोसेससह येतो. मागील जनरेशनच्या तुलनेत हा टीव्ही चारपटीने चांगला परफॉर्मंस देईल.
कंपनीचा हा टीव्ही आधीच्या मॉडेलपेक्षा ७० टक्के चांगले ग्राफिक्स देते. या टीव्हीचा प्रोसेसिंग स्पीड खूप चांगला आहे. हा टीव्ही कंपनीच्या झिरो कनेक्टबॉक्ससह येतो. हा बॉक्स वायरलेस पद्धतीने टीव्हीव ऑडिओ आणि व्हिडिओ दाखवण्यास सक्षम असेल.
या टीव्हीला तुम्ही सर्व स्ट्रिमिंग डिव्हाइसेस आणि गेम कन्सोल बॉक्सशी कनेक्ट करु शकता. या टिव्हीला स्पीकर्स जोडण्यात आले आहेत. टीव्हीमध्ये बॅकलाइट्स देण्यात आले आहे. हा नवीन टीव्ही अनेक पर्यायांसह बाजारात उपलब्ध होईल असे कंपनीने सांगितले आहे.
News Credit:
साम Tv
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा