डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

महिलांसाठी मोदी सरकारच्या ४ जबरदस्त योजना; घरबसल्या कमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

 चांगल्या बिझनेस आयडियाच्या डोक्यात असूनही अनेक महिलांना पैशांच्या अभावी आपली इच्छा पूर्ण करण्यास अडथळा येत आहेत. 

हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने देशातील होतकरू महिलांसाठी काही जबरदस्त योजना आणल्या आहेत. या योजनेमार्फत महिला घरबसल्या लाखो रुपये कमावून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतात. चला तर जाणून घेऊयात मोदी सरकारच्या ४ योजनांबद्दल...



स्टँड अप इंडिया योजना (Stand-up India)

स्टँड अप इंडिया ही योजना महिलांसाठी खूपच खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंचे कर्ज दिले जाते. योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही औद्योगिक कंपनीत महिलांचा ५१ टक्के हिस्सा असावा लागतो.


प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana)

महिला व्यावसायिकांची (Government Scheme) संख्या वाढवणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे उद्दिष्ट आहे. याद्वारे महिलांना सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी कर्ज दिले जाते. यामध्ये महिलांना काहीही गहाण न ठेवता १० लाखांपर्यंचे कर्ज दिले जाते. या कर्जावरही सरकारला कमी व्याज द्यावे लागते. कर्जाची परतफेड करण्याची कालावधी ३ ते ५ वर्षांचा आहे.


महिला कॉयर विकास योजना (Mahila Coir Yojana)

या योजनेअंतर्गत महिलांमधील कौशल्य विकासाला चालना दिली जाते. यामध्ये नारळाच्या उद्योगाशी संबंधित महिलांना दोन महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाते. या काळात महिलांना मासिक भत्ताही मिळतो. याशिवाय त्यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी ७५ टक्के कर्ज मिळते. महिलांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणेही सरकारने बंधनकारक केले आहे.


महिला समृद्धी योजना (Mahila Samriddhi Yojana)

महिला समृद्धी योजनेअंतर्गत कोणताही छोटा-मोठा उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना १.४० लाख रुपयांपर्यंत कर्जाचा लाभ घेता येऊ शकतो. या कर्जाच्या व्याजावर सरकारकडून सूटही मिळते. या योजनेचा लाभ फक्त मागासवर्गीय महिला किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच घेता येऊ शकतो.

News credit:

साम Tv


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक