महिलांमध्ये वाढतोय गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आजही आपल्या देशातील महिला आरोग्याच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यास आणि वैद्यकीय सल्ला मोकळेपणाने घेण्यास घाबरतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना विशिष्ट समस्यांची जाणीव नसते आणि ते शांतपणे सहन करतात.
महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या (कर्करोगाचे कॅन्सर) प्रमाण वाढत चालले आहे. देशभरात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने महिलांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी सुमारे १.२५ लाख प्रकरणे आणि सुमारे ७५ हजार मृत्यूची नोंद होते, हे फार धक्कादायक आहे.
गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. हा कर्करोग 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' (HPV) या इन्फेक्शनमुळे होतो. ह्याचे निदान नियमित 'पॅप स्मियर' नामक परीक्षणाद्वारे करता येते. याचे निदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या पॅप स्मिअर चाचणीत रुग्णाला पाठीवर झोपवून स्पेकलमच्या साह्याने गर्भाशयाची तपासणी केली जाते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी महिलांना दरवर्षी पॅप स्मियर किंवा स्क्रीनिंग करण्याची आवश्यकता आहे का? याच विषयावर गुरुग्राम येथील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरुणा कालरा, यांनी सांगितलं “गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग महिलांमध्ये होतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ह्युमन पॅपिलोमाव्हायरसमुळे होतो. एचपीव्ही हे गर्भाशयाच्या मुखाच्या ९५ टक्के पेक्षा जास्त कर्करोगाचे कारण आहे. एचपीव्ही सहसा लैंगिक संभोगाद्वारे पसरतो. गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे ‘Cervix’ (सर्व्हिक्स) किंवा ग्रीवा. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. स्त्रीयांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो.”
लैंगिक दृष्ट्या अति-सक्रिय असणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी या व्हायरसचं संक्रमण होतं. ह्युमन पॅपिलोमाव्हायरसचे अनेक स्ट्रेन असतात. यातील काही स्ट्रेन घातक आहेत. याचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. पण ह्युमन पॅपिलोमाव्हायरस चा संसर्ग झालेल्या प्रत्येकालाच कॅन्सर होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनाच त्रास होण्याची शक्यता असते.
तज्ज्ञ सांगतात, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगचा धोका कमी करण्यासाठी ‘लस’ उपलब्ध आहे. पण लोकांमध्ये या लशीबाबत जनजागृती नाही. अनेक महिलांना लस घेतल्याने गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग टाळता येणं शक्य आहे याची माहितीच नाही. गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं सुरूवातीला काहीच दिसून येत नाहीत. पण हळूहळू मासिकपाळीच्या दिवसात अति-रक्तस्राव होणं, लैंगिक संबंध ठेवल्यानंतर होणारा रक्तस्राव, वारंवार योनीमार्गाचं इंन्फेक्शन, योनीमार्गातून सतत निघणारा पांढरा द्रव अशा समस्या दिसून येतात.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग शोधण्यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्या चाचण्या आहेत. त्यातील एक पॅप चाचणी. तुम्हाला तुम्हाला दरवर्षी पॅप टेस्टची गरज असते. जर तुमची पॅप टेस्ट आणि एचपीव्ही टेस्ट दोन्ही नॉर्मल असतील, तर दरवर्षी पॅप टेस्ट करण्याची गरज नाही. २१ ते ३० वयोगटातील महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की, त्यांनी दर तीन वर्षांनी पॅप चाचणी करावी. ३० ते ६४ वयोगटातील, दर पाच वर्षांनी पॅप चाचणी आणि एचपीव्ही चाचणी करावी. ६५ आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी, डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असल्यास, दर पाच वर्षांनी चाचणी करा, असे त्या सांगतात.
कोणतीही लक्षणे नसल्यास तपासणी करण्याची आवश्यकता नाही. लक्षणे नसलेल्या महिलांमध्ये गर्भाशय ग्रीवामध्ये पेशींमध्ये काही असामान्य बदल होत आहेत का हे शोधण्यासाठी स्क्रीनिंग चाचणी केली जाते. असामान्य ग्रीवाच्या पेशीमुळे कोणतीही लक्षणे पूर्वी उद्भवत नाहीत परंतु स्क्रीनिंग दरम्यान आढळू शकतात, असेही त्या नमूद करतात.
साभार
लोकसत्ता
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा