डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

रजिस्ट्रेशन केल्याशिवाय अयोध्येत रामाचं दर्शन घेताच येणार नाही, जाणून घ्या बुकिंगपासून संपूर्ण प्रोसेस

 अयोध्येत प्रभू रामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आहे. गाभाऱ्यात प्रभू रामांची बालस्वरूपातील मूर्ती स्थापित केली गेली आहे. आता 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर डोळ्यावरची पट्टी काढली जाईल आणि मंदिर दर्शनासाठी खुलं होईल.



22 जानेवारीनंतर भक्तांना खरी ओढ लागणार आहे ती दर्शनाची..यासाठी भाविकांनी आतापासून योजना आखण्यास सुरुवात केली आहे. पण तुम्हालाही दर्शनाला जाण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तिथे गेल्यावर तुमच्या पदरी निराशा पडायला नको. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय दर्शनाला गेलं तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे दर्शनाची वेळ, आरती, श्रृंगाराबाबत जाणून घ्या. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजून घ्या.

रामाच्या दर्शनासाठी असं कराल ऑनलाईन बुकिंग

-> सर्वात आधी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाईटवर (https://online.srjbtkshetra.org) वर जा. मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा,

->तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकताच पेज ओपन होईल.

->पेजवर गेल्यावर ‘Darshan’ पर्यायावर क्लिक करा. एक पेज समोर येईल.

->यात दर्शन घ्यायची तारीख, वेळ, भक्तांची संख्या, देश, राज्य आणि मोबाईल नंबर टाकून फोटो अपलोड करावा लागेल.

या पद्धतीने दर्शनासाठी आपलं बुकिंग होईल

याच पद्धतीने आरतीसाठी वेगळी बुकिंग करावी लागेल.

बुकिंग केलं नाही तर काय असेल पर्याय

प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केलं नाही तर मंदिराजवळील काउंटरवर सरकार मान्यताप्राप्त ओळखत्र दाखवून तिकिट घेऊ शकता.

राम मंदिरात प्रवेश करण्यापासून दर्शन घेण्यापर्यंत काही नियमांचं पालन करावं लागेल

महिला आणि पुरुषांना पारंपरिक ड्रेस अनिवार्य आहे.

पुरुषांसाठी धोती-कुर्ता किंवा पायजमा असेल. महिसांसाठी पंजाबी ड्रेस दुपट्ट्यासह किंवा चूडीदार सूट दुपट्ट्यासह यावं लागेल.

दहा वर्षाखालील मुलांना तिकीट घेण्याची गरज नाही.

दर्शनासाठी जाताना ओळखपत्र जवळ असणं अनिवार्य आहे.

एका तिकीटावर एकच भाविक मंदिरात प्रवेश करू शकतो.

जर एखाद्या भाविकाने स्लॉट रद्द केला तर ती जागा इतर भाविकांना मिळेल.

दर्शनासाठी 24 तासात अधिकृत वेबसाईटवर रिमाइंडर मेसेज किंवा मेल येईल.

भाविक 24 तासांपूर्वी तिकिट रद्द करू शकतात.

अयोध्येत प्रभू रामाचं दर्शन सकाळी 6 ते सकाळी 11.30 पर्यंत असेल. त्यानंतर दुपारी 2 नंतर रात्री 7 वाजेपर्यंत दर्शन करता येईल. प्रभू रामांची पाच वेळा आरती होईल. पण भाविकांना तीन आरती घेता येतील. यात पहिली श्रृंगार आरती 6.30, त्यानंतर मध्यान्ह आरती दुपारी 12 वाजता आणि संध्याआरती 7.30 वाजता असेल.

साभार

Tv9 मराठी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक