डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

सुंदर बोधकथा

 सदर बोधकथा ही फेसबुक ग्रुप सुंदर विचार धारा वरून घेतली आहे , मला ही बोधकथा आवडली म्हणून येथे देत आहोत.

*अतिशय सुंदर बोधकथा*




*एके दिवशी (संध्याकाळच्या सुमारास) सरयू नदीच्या तटावर.....तीन्ही भावांसह फिरत असता श्री रामाला बंधू भरतानं म्हटलं , "एक गोष्ट विचारू दादा? माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमांनुसार) तर मृत्युदण्डच दिला जात असतो, तर मग तू , जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास ?"*


*यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले, "तुला माहित आहे भरता !! एखाद्या कुलात जेव्हा चरित्रवान और धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पीढ्यांतील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात्म्याला जन्म दिला असेल , तिला दंड कसा बरं देता येईल भरता ?"*


*यावर भरताचं कांही समाधान झालं नाही. तो म्हणाला, "हा तर मोह आहे दादा; आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकईला दंड कां नाही दिलास ?.......असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय."*


    *(श्रीराम गंभीर झाले )...... काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले, "हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे !! माता कैकईनं आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे. वनवासाच्या (१४) चौदा वर्षांत आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो ; पण माता कैकई प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती. आपल्या त्या एका अपराधासाठी तिनं आपला पति गमावला, आपले चारही पुत्र ती गमावून बसली, स्वतःचं सर्व सुख - सन्मान तीनं गमावला, आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणिवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा ....... परिवारतील उर्वरित सगळेच सदस्य आनंदी आणि सुखी झालेत; पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव याचंच दुःख होतं की माझ्या मुळेच (अकारण) माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला."*


       *रामाच्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहात होत्या, आणि भरतासह सर्व भाऊ नि:शब्द होऊन गेले.*


    *रामचंद्र पुन्हा सांगू लागले ....... "आणि तिच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी कां समजायचं भरता !!...... जर मला वनवास झाला नसता] , तर हे जग 'भरत' आणि 'लक्ष्मण' या भावंडांचं अतुल्य भ्रातृ - प्रेम कसं पाहू शकलं असतं ? मी तर केवळ माझ्या माता पित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता, पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी १४ वर्षाचा वनवास भोगलात. माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं कां ?"*


*भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. कांहीही न बोलता त्यानं श्रीरामांना प्रेमभरानं आलिंगन दिलं. !!*


 *राम काही कुठला नारा नाही, राम एक आचरण आहे, एक चरित्र आहे , जीवन जगण्याची एक शैली आहे.*


  *👣 🙏 जय श्रीराम 🙏👣*


 *सादर: ही कथा मला अतिशय प्रेरक, आपल्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा असल्यासारखी वाटली म्हणून प्रेषित करीत आहे.

साभार

सुंदर विचार धारा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक