गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर उपाय काय?" अक्षया देवधरने महिलांना केलं आवाहन; म्हणाली, "कृपया याकडे.गांभीर्याने पाहा"
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाली.
सध्या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमांतून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकताच स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात शेअर केलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.
अक्षया देवधर या व्हिडीओमध्ये सांगते, 'सध्या सर्वत्र कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे. विशेषत: महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) आणि ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास होतो. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नेमका उपाय काय? याबद्दल आपल्याला कायम प्रश्न पडतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी भारताने स्वतःची लस विकसित केली आहे. या लसीचं नाव एचपीव्ही असं आहे. याचे सध्या तीन डोस उपलब्ध आहेत आणि हे संपूर्ण डोस महिलांना पूर्ण करावे लागतात. मला हे सांगताना अतिशय खेद वाटतो की, या लसीकरणाबाबत मला काहीच माहिती नव्हती. काही महिलांमध्ये आजही याबाबत जागृती निर्माण झालेली नाही.'
अक्षया पुढे म्हणाला, 'मला याबाबत माहिती मिळाल्यावर मी सर्वप्रथम हे डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच मी याचा दुसरा डोस घेतला. जास्तीत जास्त महिलांपर्यंत याची माहिती पोहोचणं गरजेचं आहे. माझा व्हिडीओ जर कोणी पुरुष पाहत असतील तर तुमच्या आजूबाजूच्या महिला, मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवा. या लसीकरणाबाबत कोणतीही शंका किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संवाद साधा. वयाच्या ९ व्या वर्षापासून ही लस मुली घेऊ शकतात. त्यामुळे कृपया याकडे गांभीर्याने पाहा आणि जास्तीत जास्त मुलींना याची माहिती द्या.'
News credit:
लोकसत्ता
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा