डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

सुधा मूर्तीच्या पालकत्वाच्या टिप्स जाणून घेऊयात...



सुधा मूर्तींच्या मते, मुलांची तुलना इतर मुलांशी कधीही करू नये. कारण प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. असे केल्याने त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

> मुलांना त्यांच्या वयानुसार जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात केली पाहिजे. यामुळे मुलांची निर्णय क्षमता चांगली होती. याशिवाय त्यांच्यातला समजूतदारपणाही विकसित होतो.

> त्याचबरोबर मुलांशी नेहमी संवाद साधत राहा. संवादाच्या अभावामुळे मुले आणि पालक यांच्यात अंतर निर्माण होते. याशिवाय पैशाची किंमत मुलांना जरूर सांगावी. गरज जाणून घेतल्याशिवाय त्याला पैसे देऊ नका.

> पालकांनी मुलांना पुस्तके देऊन त्यांचे वाढते गॅजेट व्यसन कमी करावे. पुस्तकांची मैत्री त्यांचे ज्ञान वाढवून त्यांना एक चांगली व्यक्ती बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक