महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केली तर मिळतात 'हे' फायदे! वाचतो पैसाच पैसा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बरेचदा आपण घर घेताना कर्ज घेतो व या कर्जावर आपल्याला व्याज द्यावे लागते. परंतु जर तुम्ही अशी रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत असाल तर महिलांच्या नावे केली तर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात.
रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली तर महिलांना मिळतात हे फायदे.
1- कर्ज व व्याज दरा मध्ये मिळते सवलत
जर गृह कर्ज घेताना ते महिलांच्या नावाने घेतले तर अनेक प्रकारचे आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे फायदे मिळू शकतात.
यामध्ये बऱ्याच बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष योजना व ऑफर्सची देखील घोषणा केली जाते. आपण पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी चा विचार केला तर महिलांना गृहकर्जावरील व्याजदर हा 0.20 ते 0.50% पर्यंत कमी असतो. तसेच कर्ज परतफेडीचा जो काही कालावधी असतो तो पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी जास्त असतो.
2- स्टॅम्प ड्युटीत होतो फायदा
आपल्याला माहित आहे की मालमत्तेची खरेदी विक्री जेव्हा होते तेव्हा मुद्रांक शुल्क आकारले जाते. साधारणपणे सहा ते आठ टक्क्यांपर्यंत मुद्रांक शुल्क हे आकारले जात असते. मुद्रांक शुल्क ही संबंधित प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेची किंमत किती आहे त्यानुसार ठरते.
परंतु जर तुम्ही महिलांच्या नावाने मालमत्ता खरेदी केली तर मुद्रांक शुल्कामध्ये चांगली सवलत मिळते. महिलांना जवळपास मुद्रांक शुल्क मध्ये एक टक्क्यांपर्यंत सवलत सरकारकडून दिली जाते. त्यामुळे मुद्रांक शुल्क यावर जी काही सगळ्यात जास्त रक्कम खर्च होत असते ती तुम्ही वाचवू शकता.
3- सरकारी योजनांचा मिळतो फायदा
प्रॉपर्टीमध्ये महिलांनी गुंतवणूक करावी याकरिता प्रोत्साहन देण्याकरिता सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्यामुळे महिलांच्या नावावर जर प्रॉपर्टी खरेदी केली तर अशावेळी त्यांचा फायदा घेता येतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर पंतप्रधान आवास योजना तसेच क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम यासारख्या अनेक योजनांचे फायदे मिळू शकतात. नाहीतर अनेक हाऊसिंग फायनान्स कंपनी व बँकांच्या योजनांचा देखील फायदा मिळतो.
4- करात मिळते सवलत
जर पती व पत्नी दोघांनी संयुक्तपणे प्रॉपर्टी खरेदी केली तर त्यांना घरात सवलत मिळण्यास मदत होते. कलम 80 C,24 आणि कलम 80 EE आणि 80 EEA अंतर्गत गृह कर्जाच्या परतफेडीवर दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा देखील फायदा मिळतो.
करावरील इतर फायदे:
-जर पती स्वयंरोजगार असेल आणि त्याच्यावर कर्ज किंवा व्यवसायात तोटा झाला असेल तर, पत्नीच्या नावावर नोंदणीकृत असल्यास, तोटा भरून काढण्यासाठी मालमत्ता संलग्न करता येणार नाही.
-तुमच्या पत्नीला मालमत्तेची सह-मालक बनवणे, ज्याला ‘संयुक्त मालकी’ असेही म्हटले जाते, जर दोन्ही भागीदारांचे उत्पन्नाचे स्वतंत्र स्त्रोत असेल तर ते फायदेशीर ठरते, कारण दोघेही गृहकर्जावर भरलेल्या व्याजासाठी करात सूट मिळू शकतात.
-जर पतीकडे इतर काही मालमत्ता असतील तर, पत्नीच्या नावावर मालमत्ता नोंदणी केल्याने त्याची संपत्ती कर दायित्व कमी होईल.
साभार
अहमदनगर Live24
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा