डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

दीर्घ बॅटरी लाइफ आणि पॉवरफुल फीचर्स असलेले इअरबड्स

 तुम्ही दीर्घ बॅटरी लाइफ आणि पॉवरफुल फीचर्स असलेले इअरबड्स शोधत असाल, जे गेमिंगदरम्यानही उपयुक्त ठरतील, तर Truk चे नवीन इअरबड्स तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात.



कंपनीने आपले नवीन TWS इयरबड्स Truke Clarity Six लॉन्च केले आहेत.

हे क्लॅरिटी 5 चे अपडेटेड व्हर्जन आहे, जे ऑगस्ट 2023 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. नवीन इयरबड्समध्ये इन-इअर स्टाइल आहे आणि ते 13 मिमी टायटॅनियम ड्रायव्हर्ससह सुसज्ज आहेत. याची बॅटरी 80 तास चालते, असा कंपनीचा दावा आहे.

एकसोबत दोन मोबाईलमध्ये होईल कनेक्ट

यात तीन प्रीसेट इक्वेलायझर मोड (डायनॅमिक, मूव्ही आणि बास बूस्ट मोड) आहेत, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या आवडीनुसार ऑडिओचा चांगला अनुभव घेऊ शकतात. याशिवाय, यात ड्युअल कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट आहे, ज्याच्या मदतीने हे एकाच वेळी दोन मोबाईलमध्ये वापरले जाऊ शकते. इअरबड्समध्ये गेमर्ससाठी 35ms लो-लेटेंसी मोड देखील आहे. 

इअरबड्स टच कंट्रोलसह येतात आणि व्हॉइस असिस्टंटला देखील सपोर्ट करतात. इयरबड्स ब्लूटूथ व्हर्जन 5.3 वर काम करतात आणि चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे इअरबड्स पूर्ण चार्ज केल्यावर 10 तास टिकतात, तर केसमध्ये ते एकूण 80 तास चालू रहातात.


किती आहे किंमत?

कंपनीने हे फक्त ब्लॅक रंगात लॉन्च केले आहे. ट्रू क्लॅरिटी सिक्स 26 डिसेंबरपासून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर 1,299 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत खरेदीसाठी उपलब्ध असेल. कंपनी यावर 1 वर्षाची वॉरंटीही देत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक