डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्याल!

 ऑनलाईन शॉपिंग हल्ली मुलंही मोठ्या प्रमाणावर करतात. आईबाबांची क्रेडिट कार्ड्स वापरुन मुलांच्या आणि टिनेजर्सच्या शॉपिंगचं प्रमाण वाढत असताना, मोठ्यांबरोबरच मुलांनीही ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करायचं हे समजून घेतलं पाहिजे



ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्याल!

>ज्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन शाॅपिंग करायची आहे तो साईट खात्रीलायक आहे का? हे तपासा. कुठल्यातरी लिंकवरुन आलेल्या साईटवरून शॉपिंग करू नका. तुम्ही पूर्वी ज्या साईट्सवरून शॉपिंग केलेलं आहे अशीच साईट शक्यतो निवडा. काही वेळा साईटस्ही खाेट्या असू शकतात. अशावेळी तुमच्या बँक डिटल्सचा, क्रेडिट कार्ड डिटेल्सचा गैरवापर होऊ शकतो. 

>फेक वेबसाईटमध्ये मूळ खऱ्या वेबसाईटच्या नावात, लोगोच्या डिझाईनमध्ये किंचित बदल केलेला असतो. त्यामुळे वेबसाईट उघडताना, उघडल्यावर आपण ओरिजिनल वेबसाईटवरच आहोत ना हे तपासा. 

>वेबसाईटवरचे कीप मी लॉग्ड इन किंवा रिमेम्बर मी सारखे पर्याय कधीही निवडू नका. 

>डिस्काउंट कुपन्स, पे बॅक ऑफर्स, फेस्टिव्हल कुपन्स यांच्या मोहात अडकू नका. अमुक तमुक कुपन मिळवण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा, असा मेसेज असेल तर तो ९९ टक्के फेक आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला ठगण्यासाठी खोटी लिंक, कुपन किंवा QR कोड पाठवलेला असू शकतो. 

>शॉपिंग ऍप किंवा वेबसाईटवर जर एखादा फॉर्म असेल आणि ऑटो फीलअप करा असं म्हणत असेल तर कधीही ऑटो फीलअप करु नका. या फॉर्म्समध्ये काही वेळा तुमचे बँक, क्रेडिट/डेबिट कार्ड डिटेल, सीव्हीव्ही नंबर, खाते क्रमांक या गोष्टीही सेव्ह करण्याची सोय असते. त्यांचा गैरवापर होऊ शकतो. 

>गुगलवरुन कस्टमर केअर नंबर कधीही घेऊ नका. गुगलमध्ये नंबर एडिट करण्याची सोय आहे. त्यामुळे गुन्हेगार मूळ नंबर बदलून त्यांचा नंबर टाकून तुम्हाला फसवू शकतो. त्यामुळे कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जो कस्टमर केअर नंबर दिलेला असतो त्यावरच कॉल करा. 

> दिशाभूल करणाऱ्या ऑफर्स उदाहरणार्थ अमेझॉनकडून आयफोन मोफत मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा. अशा प्रकारचा मेसेज आला, तर अगदी मूलभूत प्रश्न स्वतःला विचारा, अमेझॉन कशाला कुणाला आयफोन फुकट देईल? तरीही मोह होतच असेल तर एकदा अमेझॉनच्या साईटवर जाऊन खरंच अशी कुठली ऑफर सुरु आहे का हे तपासा. मागचा पुढचा विचार न करता, काहीतरी फुकट मिळतंय म्हणून गुन्हेगारांच्या गळाला लागू नका. 

> OTP कधीही कुणाशीही शेअर करू नका. जर समोरची व्यक्ती क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा OTP मागत असेल तर तो तुम्हाला फसवू बघतोय हे लक्षात घ्या आणि लगेच चालू असलेलं कॉन्व्हेरिसेशन बंद करा. नंबर ब्लॉक करा. त्या नंबर वरुन आलेल्या लिंक्सवर क्लिक करू नका. 

> क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून ऑनलाईन शाॅपिंग करायचं असेल तर ते घरच्या किंवा ऑफिसच्या संगणकावरुनच केलं पाहिजे. या गाेष्टी नेट कॅफेत बसून करु नयेत. कॅफेत एकच संगणक अनेकजण वापरतात. अशावेळी तुम्ही नीट संगणक बंद केला नाही तर तुमचा पासवर्ड किंवा इतर व्यक्तिगत माहिती इतरांना मिळण्याचा धाेका असू शकताे. 

> ऑनलाईन शाॅपिंग करत असताना समजा त्या साईटने तुम्हाला अनावश्यक माहिती विचारली, म्हणजे तुमचा खाते क्रमांक, त्याचा ऑनलाईन पासवर्ड किंवा एटीम कार्डनंबर तर ताे अजिबात देऊ नका. 

समजा, तुमची ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झालीच तर लगेच जवळच्या पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदवा. जितकी लवकर तक्रार नोंदवाल तितक्या पैसे परत मिळण्याच्या शक्यता वाढू शकतात. 

तुम्ही ऑनलाईन तक्रारही नोंदवू शकता. https://cybercrime.gov.in/ या सरकारी साईटवर तुम्ही झालेल्या फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता. 

साभार 

मुक्ता चैतन्य

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक