डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

होमलोन घेताना या गोष्टींची घ्या काळजी

 



होमलोन घेताना या गोष्टींची घ्या काळजी

1) जेव्हा तुम्ही होमलोनसाठी अर्ज करता तेव्हा तुमच्याकडे संबंधित घराच्या डाऊन पेमेंट करिता किती पैसे आहेत किंवा किती रोख रक्कम आहे याची स्वतः खात्री करून घेणे गरजेचे आहे.

जर तुम्ही संपूर्णपणे घर घेण्याकरिता होम लोन वर अवलंबून असाल तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकण्याची दाट शक्यता या माध्यमातून निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे डाऊन पेमेंट करण्याकरिता वीस ते तीस टक्के स्वतःचे पैसे असणे गरजेचे आहे.

2) तसेच तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज बँकेकडून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे असते. तुमचा सिबिल स्कोर किंवा तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर बँक किंवा इतर एनबीएफसी म्हणजेच वित्तीय संस्था तुमची कर्जाची मागणी किंवा अर्ज ताबडतोब मान्य करतात.

त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे व तुमच्या क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कमीत कमी व्याज दरात कर्ज मिळते.

3)  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही आधीच कार लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल तर तुम्ही ते लोन क्लिअर झाल्याशिवाय होम लोन घेण्याच्या भानगडीत पडू नये. जर तुम्ही अगोदरच पर्सनल लोन किंवा कार लोन फेडत असाल तर यामध्ये तुम्ही होम लोन घेतले तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये ईएमआय भरावा लागू शकतो.

त्यामुळे गृह कर्ज घेताना तुम्ही तुमच्याकडे कुठल्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे अगोदर कर्ज नाही त्याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुमचे आर्थिक बजेट बिघडण्याची खूप दाट शक्यता असते.

4)  तुम्हाला एखादे घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुमची आर्थिक क्षमता किंवा तुमचा बजेट लक्षात ठेवूनच निर्णय घ्यावा. जर तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी खरेदी केली तर तुम्हाला अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

याव्यतिरिक्त तुम्ही बजेटमध्ये राहून मालमत्ता खरेदी केली तर तुम्हाला पैशांची व्यवस्था करणे देखील सोपे होते व तुमच्या डोक्यावर कमीत कमी कर्जाचा बोजा पडतो. या दृष्टिकोनातून आपण होमलोन घेताना या छोट्या परंतु अतिशय महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक