Cyber Security Tips
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
१) आपल्या इंटरनेट/मोबाईल बँकिंगचा पासवर्ड, ईमेल्स आणि सोशल मीडियाचा पासवर्ड विचित्र असायला हवा. तो जितका विचित्र तितका उत्तम. त्यात कधीही आपला, कुटुंबीयांचा वाढदिवस./लग्नाच्या तारखा/नावं नकोत. तो कुणाशीही शेअर करायचा नाही.
२) हल्ली २ वे ऑथेंटिफिकेशनची सोय दिलेली असते. म्हणजे पासवर्ड टाकल्यानंतरही अजून एक टप्पा असतो, ज्यात अजून एखादा पासवर्ड किंवा ओटीपी असतो, जो टाकून प्रोफाइल उघडता येतं. अशा दिलेल्या सोप्या सोयी सुरक्षेसाठी वापरल्या पाहिजेत.
३) पासवर्ड वरचेवर बदलला पाहिजे.
४) लॅपटॉप, डेक्सटॉप, मोबाईल यात चांगला अँटी व्हायरस प्रोग्रॅम असायला हवा. अनेकदा लॅपटॉप आणि डेस्कटॉपमध्ये अँटी व्हायरस टाकला जातो, पण मोबाईलमध्ये टाकला जात नाही आणि मोबाईल हॅक होतो. अनेकदा आपला मोबाईल आपल्या निरनिरळ्या प्रकारच्या अकौंट्सशी जोडलेला असतो त्यामुळे मोबाइलमध्येही अँटी व्हायरस हवाच.
५) कुठल्याही अनोळखी लिंकवर, मग ती कुणीही पाठवलेली का असेना कधीही क्लिक करू नका. अनोळखी लिंकमध्ये व्हायरस असू शकतो. तसंच कुठलाही अनोळखी आणि पूर्वकल्पना न दिलेला व्हिडीओ कॉल उचलू नका. कशावरही क्लिक करताना हजारदा विचार करा.
६) समजा तुमचं अकाउंट हॅक झालं असेल, किंवा त्यावरून काही अपेक्षित नसलेला तपशील फॉरवर्ड झाला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना तशी कल्पना द्या, जेणेकरून ते तुमच्या प्रोफाईलवरून आलेल्या लिंक्सवर क्लिक करणार नाहीत.
७) इंटरनेट कॅफेमध्ये जर सोशल मीडिया वापरत असाल तर वापरून झाल्यावर फक्त विंडो बंद न करता त्यातून लॉग आउट व्हा. हिस्ट्री आणि कुकीज डिलीट करा. सार्वजनिक संगणकांवरून शक्यतो नेट बँकिंग करू नका. जर काही डाउनलोड केले असेल तर तेही डिलीट करा.
८) तुमच्याबाबतीत किंवा कुटुंबाच्या बाबतीत काही गंभीर सायबर गुन्हा घडला असेल तर ताबडतोप सायबर पोलिसांची मदत घ्या. गप्प राहू नका. गुन्हा रिपोर्ट करा.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा