डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

अजूनही Fake SMS आणि Spam Calls येतायत? TRAI चा हा अ‍ॅप आताच इन्टॉल करा

भारतात ट्रायच्या कठोरतेनंतरही स्पॅम कॉल्स आणि बनावट एसएमएसची समस्या पूर्णपणे संपलेली नाही. तथापि, स्पॅम कॉल आणि बनावट एसएमएसच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 



पण, जर तुम्हीही स्पॅम कॉल्स आणि फेक एसएमएसने त्रस्त असाल तर हे अ‍ॅप्स (App) इन्स्टॉल करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही, तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर जाऊन ट्रायचे अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल आणि ते तुमच्या स्मार्टफोनमध्ये सक्रिय करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला कधीही स्पॅम कॉल आणि एसएमएस मिळणार नाहीत.

TRAI DND 3.0 सविस्तर

TRAI DND 3.0 अ‍ॅपचा वापर स्पॅम कॉल्स (Spam Calls) आणि संदेशांपासून मुक्त होण्यासाठी केला जातो. हे अ‍ॅप TRAI (Telecom Regulatory Authority of India) ने विकसित केले आहे. तुम्हाला हे अ‍ॅप वापरायचे असल्यास, तुम्ही Google Play Store किंवा App Store वरून ते तुमच्या डिव्हाइसवर इंस्टॉल करू शकता.

अ‍ॅपइन्स्टॉल करा

तुमच्या स्मार्टफोनवर Google Play Store किंवा Apple App Store वरून TRAI DND 3.0 अ‍ॅप डाउनलोड आणि स्थापित करा.


अ‍ॅप उघडा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका.


तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका.


साइन इन करा.


एकदा तुम्ही साइन इन केल्यानंतर, तुमचा नंबर DND सूचीमध्ये जोडला जाईल. आता तुमच्या नंबरवर येणारे नको असलेले कॉल आणि मेसेज ब्लॉक केले जातील.


इतर वैशिष्ट्ये


तुम्ही तुमच्या DND मध्ये स्पेसिफिकेशन्स सेट करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला फक्त विशेष व्यवसाय कॉल आणि संदेश प्राप्त करायचे आहेत की नाही हे तुम्ही निवडू शकता.


तुम्ही स्पॅम कॉल्स आणि मेसेजबद्दल तक्रार नोंदवू शकता.


तुम्ही तुमच्या DND तक्रारींची स्थिती तपासू शकता.

अ‍ॅप वापरण्याचे काही फायदे


हे अ‍ॅप तुम्हाला स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून मुक्त होण्यास मदत करते.


हे अ‍ॅप तुम्हाला तुमची DND प्राधान्ये सेट करण्याची आणि स्पॅम कॉल्स आणि संदेशांबद्दल तक्रार नोंदवण्याची परवानगी देते.


हे अ‍ॅप वापरण्यास सोपे आहे.

साभार

साम Tv

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक