डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

Google Kids Space: गुगलचे हे अॅप तुमच्या मुलांच्या टॅबमध्ये नक्की डाउनलोड करा, फायदे जाणून घ्या

 गुगलच्या Google Kids Space या अॅपबद्दल खुप कमी लोकांना माहिती आहे. मात्र हे अॅप तुमच्या मुलांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी खुप फायदेशीर आहे. मात्र हे अॅप केवळ टॅबमध्ये चालते ते मोबाईलमध्ये चालत नाही.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला गुगलच्या या अनोख्या अॅप, गुगल किड्स स्पेसबद्दल सांगणार आहोत. मुलांची ऑनलाइन प्रायव्हसी लक्षात घेऊन हे अॅप त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी देते.



Google Kids Space अॅपमध्ये काय खास आहे?


– Google Kids Space ऍप्लिकेशनमध्ये नवीन आणि मनोरंजक गेम समाविष्ट आहेत ज्यांच्या मदतीने मुले नवीन गोष्टी शिकू शकतात.

- विज्ञान, गणित, भूगोल आणि इतर विषयांची माहितीही या अॅपमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच पाचवीपर्यंतची मुलेही याचा वापर करू शकतात.


– गुगल किड्स ऍप्लिकेशन अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, ते वापरण्यास सोपे आहे.


– त्यात अनेक प्रकारची पुस्तकेही आहेत. याशिवाय चित्रेही देण्यात आली आहेत.


– तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना यूट्यूब ऐवजी हे अॅप वापरू द्या. इतर कार्टुन पाहण्यापेक्षा हे खुप उपयुक्त आहे.


– या खेळांमुळे मुलांचा मानसिक विकास आणि कौशल्ये सुधारण्यास मदत होते.

News credit:

प्रभात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक