डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

SpiceJet Ayodhya Air Ticket Sale

 


श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने स्पाईसजेटने एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही भारतातील कोणत्याही शहरातून अयोध्याला फक्त १६२२ रुपयात जाऊ शकता.

हे भाडे सर्वसमावेश असून मुंबई-गोवा, दिल्ली-जयपूर आणि गुवाहाटी-बागडोगरा या देशांतर्गत मार्गांवर लागू आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही २२ ते २८ जानेवारी दरम्यान तुमची बुकिंग करू शकता. तर तुमचा प्रवास कालावधी २२ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान असावे. काही ब्लॅकआउट तारखांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही, हे लक्षात ठेवा.

स्पाईसजेटने अयोध्याला जोडण्यासाठी नवीन फ्लाइट्स देखील सुरू केल्या आहेत. १ फेब्रुवारी २०२४ पासून स्पाईसजेट दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू, जयपूर, पाटणा, दरभंगा आणि मुंबई येथून अयोध्यासाठी नॉन-स्टॉप फ्लाइट्स सुरू करणार आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही डोमॅस्टिक आणि आंतरराष्ट्रीय डायरेक्ट वन वे फ्लाइटसाठी फक्त १६२२ रुपयात प्रवास करू शकता. यामध्ये स्पाईसमॅक्स, You 1st आणि पसंती सीट्सवर ३० टक्क्यांपर्यंत सवलत देखील मिळत आहे, अशी माहिती स्पाईसजेटचे चीफ कमर्शियल ऑफिसर शिल्पा भाटिया यांनी दिली.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही स्पाईसजेटची वेबसाइट, एम-साईट, मोबाईल अॅप किंवा निवडक ट्रॅव्हल एजंट्सकडून बुकिंग करू शकता. यासोबतच या ऑफर अंतर्गत केलेल्या बुकिंगसाठी फ्री डेट चेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात. याचा लाभ तुम्ही फ्लाइट प्रस्थान वेळेच्या किमान ९६ तास आधी घेऊ शकता. तर तुम्हीही अयोध्याला भेट देण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. आजच स्पाईसजेटची बुकिंग करा आणि अविस्मरणीय प्रवासाचा आनंद घ्या!

साभार

Hindustan Times Marathi 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक