इलेक्ट्रिक कार (ईव्ही) घ्यायचीय? ही बँक देत आहे 100% कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आता पेट्रोलच्या दरांची चिंता न करता इलेक्ट्रिक कार (ईव्ही) घ्यायची असेल तर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी ईव्ही कार खरेदीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एसबीआयने स्वस्त व्याजदरात कर्ज देणाऱ्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे ईव्ही कार घ्यायचं तुमचं स्वप्न सहज पूर्ण होऊ शकतं.
एसबीआय ही देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे. ईव्ही कार घेण्यासाठी एसबीआयने नवीन योजना आणली आहे. या योजनेद्वारे 21 ते 70 वर्ष वयाच्या ग्राहकांना तीन ते आठ वर्षांच्या मुदतीसाठी सुलभ हप्त्यांत कर्ज दिलं जाणार आहे. सर्वसाधारण ऑटो लोनपेक्षा ईव्ही ऑटो लोनच्या व्याजदरात 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. एवढंच नाही तर कारच्या ऑन रोड किमतीच्या 90 टक्के कर्ज दिलं जातं. काही गाड्यांसाठी तर चक्क 100 टक्के कर्ज मिळू शकतं. त्यामुळे तुमच्याकडे आत्ता डाऊन पेमेंट करायला काहीही सेव्हिंग नसेल तरी तुम्ही सहज कार घरी आणू शकता.
स्टेट बँक सध्या ऑटो लोनवर 8.85 ते 9.80 टक्के व्याजदर आकारते. ईव्ही कारसाठी हा व्याज दर 8.75 ते 9.45 पर्यंत कमी होतो. विविध वयोगटातील व्यक्तींसाठी एसबीआयने कर्ज योजना आणल्या आहेत. वार्षिक उत्पन्न किमान तीन लाख रुपये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बँक निव्वळ मासिक उत्पन्नाच्या 48 पट कर्ज देते. वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये असल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या तिप्पट कर्ज मिळू शकतं. उद्योजक, नोकरदार यांना त्यांच्या आयटीआरमधील टॅक्सेबल उत्पन्नाच्या किंवा निव्वळ नफ्याच्या चौपट कर्ज मिळू शकतं.
तुम्ही ईव्ही कार घेण्यास इच्छुक असाल तर कर्ज घेण्यासाठी जाताना मागील सहा महिन्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट तुम्ही सादर करणं अपेक्षित आहे. दोन पासपोर्ट आकारातील फोटो आणि इतर ओळखपत्रांची पूर्तता केल्यानंतर एसबीआय तुम्हाला ईव्ही कार खरेदीसाठी कर्ज देते.
News Credit:
News 18 लोकमत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा