डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

सॅमसंगने आपला नवीन फिटनेस ट्रॅकर 'गॅलेक्सी फिट 3' भारतात लॉन्च केला आहे.

Samsung Galaxy Fit 3 Launched In India: 13 दिवसांपर्यंतच्या बॅटरी लाइफसह भारतात लॉन्च झाले 'सॅमसंग गॅलॅक्‍सी फिट 3' फिटनेस ट्रॅकर; किंमत आणि वैशिष्ट्य घ्या जाणून 



Samsung Galaxy Fit 3 Launched In India: सॅमसंगने आपला नवीन फिटनेस ट्रॅकर 'गॅलेक्सी फिट 3' भारतात लॉन्च केला आहे. यापूर्वी Samsung Galaxy ने Galaxy Fit 2 लाँच केले होते. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

नवीन लाँच केलेल्या फिटनेस ट्रॅकरची किंमत 4,999 रुपये असणार आहे. ग्राहकांना फिटनेस ट्रॅकरग्रे, पिंक गोल्ड आणि सिल्व्हर या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक Samsung अधिकृत वेबसाइट तसेच इतर प्रमुख ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे हा ट्रॅकर खरेदी करु शकतात. वेलनेसच्‍या या नवीन युगामध्‍ये वापरकर्त्‍यांची त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत अधिक सर्वसमावेशक माहिती मिळण्‍याची इच्‍छा आहे आणि सॅमसंग वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या वेलनेस प्रवसामध्‍ये मदत करण्‍यासाठी प्रगत हेल्‍थ मॉनिटरिंग टूल्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक आदित्‍य बाबर यांनी सांगितलं.

गॅलॅक्‍सी फिट 3 अॅल्‍युमिनिअम बॉडी आणि १.6-इंच डिस्‍प्‍लेसह डिझाइन करण्‍यात आले आहे, जे पूर्वीच्‍या मॉडेलपेक्षा 45 टक्‍के मोठे आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना क्षणात सविस्‍तर माहिती तपासणे सुलभ जाते. गॅलॅक्‍सी फिट3 वजनाने हलका आणि स्‍लीक आहे. त्यामुळे तो मनगटावर आरामात फिट बसतो. वापरकर्ते त्‍यांच्‍या जीवनशैलीमध्‍ये गॅलॅक्‍सी फिट३ चा समावेश करू शकतात. या डिवाईसमधील दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी जवळपास 13 दिवस कार्यरत राहू शकते.

News Credit:

लेटेस्ट ली


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक