डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

5G Smartphone : 15 हजारांपेक्षा स्वस्त 5G स्मार्टफोन घ्यायचा आहे का? मग हे पाच पर्याय ठरतील बेस्ट

 भारतात 5 जी सर्व्हिस सुरु झाली असून अनेक जण आपला हँडसेट बदलण्याच्या तयारीत आहेत. 5 जी सुविधेमुळे हाय स्पीड इंटरनेटचा फायदा घेऊ शकतो. भविष्याच्या दृष्टीकोनातून अनेक कंपन्यांनी आपले 5 जी स्मार्टफोन लाँच केले आहे.



पण काही जणांचं बजेट नसल्याने 4 जी स्मार्टफोनवर समाधान मानत आहेत. पण तुम्हालाही 5 जी स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेडमी ते सॅमसंगसारखे टॉप ब्रँडने स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन आणले आहेत. 

सॅमसंग Galaxy M13

Samsung Galaxy M13 ची किंमत 13,380 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, ट्रिपल कॅमेरा सेटअप (50MP+5MP+2MP, 8MP फ्रंट कॅमेरा) आणि अनेक उत्तम फीचर्स आहेत.

रेडमी 12 5G

भारतात रेडमी फोनचेही चाहते आहेत. Redmi 12 5G ची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होते. 6.79 इंच FHD+ 90Hz डिस्प्ले उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. यात 50MP ड्युअल कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

POCO M6 Pro 5G

पोकोचे स्मार्टफोन आता भारतात हळूहळू पाय रोवत आहे. POCO M6 Pro 5G ची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 50MP + 2MP, 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

लावा ब्लेझ 5G

Lava Blaze 5G ची किंमत 11,208 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 6.5 इंच HD+ 90Hz IPS डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आहे.


Infinix HOT 20 5G

इनफिनिक्स हॉट 20 एक जबरदस्त 5 जी स्मार्टफोन आहे. कमी किमतीत हा फोन चांगले फीचर्स देतो. Infinix HOT 20 5G ची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 6.6 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. यात 5000 mAh बॅटरी, 50MP + AI लेन्स आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

News Credit:

सकाळ 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक