डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

'या' व्यक्तींना करता येईल सलग 6 महिने एसटीचा मोफत प्रवास

 यापूर्वीच राज्य शासनाने मोठे निर्णय घेत महिलांसाठी एस टी च्या तिकिटामध्ये 50 टक्के सूट दिली आहे. शिवाय जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळाकडून आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सहा महिने सलग एसटीचा प्रवास मोफत करता येणार आहे. हा प्रवास कोणाला मोफत करता येणार आहे ? त्यासाठी काय अटी आहेत चला जाणून घेऊया…

एसटी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता (Maharashtra S. T.) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या 75 वर्षांपर्यंत सलग सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एसटीचा मोफत प्रवास करता येणार आहे.

यासाठी त्यांना पास मिळणार आहे. याशिवाय, एसटी महामंडळातील (Maharashtra S. T.) सेवेत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर यांना वयाच्या ६५ वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांसाठी मोफत एसटीचा प्रवास उपलब्ध होणार आहे.

यामुळे या निर्णयाचा आता या संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. खरे तर याआधी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ एका महिन्याचा मोफत प्रवासाचा पास दिला जात असे. आता मात्र हा पाच सहा महिन्यांसाठी दिला जाणार आहे.

मात्र या मोफत पासचा वापर करून फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ सीझनमध्येच (Maharashtra S. T.) प्रवास करता येणार आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीत सलग या पासचा वापर करून या संबंधित लाभार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल. या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होणार अशी माहिती समोर येत आहे.

News Credit:

HELLO महाराष्ट्र 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक