डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

एक दिवा मिटवेल सर्व चिंता

 अंधाराकडून प्रकाशाकडे जावू, तिमिरातून तेजाकडे नेऊ असं आपण म्हणजे. दिवा हा अंधारातून आपल्यालाकडे प्रकाशाकडे घेऊन जातो. म्हणजेच नकारात्मक गोष्टीतून सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल.



ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी इन्स्टाग्रामवर दिवा आणि वातीसंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये तिने अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितली आहे. आपण कर्तव्य किंवा परंपरा म्हणून रोज घरात दिवा लावतो. पण त्याची योग्य पद्धत आपल्याला कोणी सांगितली नाही. जया हिने मात्र आपली ही समस्या दूर केली असून तिने सांगितली छोटीशी गोष्ट आपण केल्यास आपल्या घरातील अनेक संकट दूर होती.

देवघरातील दिवा हा रोज एकच असला पाहिजे. खरं तर वर्षानुवर्षे एकच दिवा देवघरात असला पाहिजे. दिवा हा कुठल्याही धातू म्हणजे सोनं, चांदी, पितळ किंवा तांब्याचा असला तरी चालतो पण तो एकच असावा, असं जया सांगते. यामागील कारण म्हणजे जेव्हा दिवा तुम्ही एकच ठेवता तेव्हा त्यातील फायर मजबूत स्थितीत येतो. यामुळे जेव्हा कोणाची एनर्जी कमी असते किंवा तब्येत ठिक नसते तेव्हा या दिव्याला धुवून त्यात पाणी टाकून देवासमोर प्रार्थना करा आणि नंतर ते पाणी ग्रहण करा. हा उपाय तुम्हाला समस्येतून मुक्ती मिळवून देतो.

दिवा लावताना आपण कधी वात कुठली लावावी याबद्दल नियम पाळत नाही. हाताला मिळेल किंवा घरात जे असेल ती वात घेऊन दिवा लावतो. पण जया म्हणते की, तुम्ही हे चुकीचं करता. तिने कुठली वात कधी लावावी याबद्दल नियम सांगितला आहे. जेव्हा तुम्ही देवतांची पूजा करता हनुमान, राम, विष्णू यांची पूजा करता तेव्हा गोलाकार वातीचा दिवा लावावा.

तर तुम्ही जेव्हा देवीची प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला लांब वातीचा दिवा लावायला पाहिजे. तसंच माता लक्ष्मीसाठी लाल रंगाची लांब वात लावली पाहिजे. जेव्हा तुम्ही लाल रंगाची वात तूपासोबत लावतात तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते.

साभार

Zee News 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक