ओएनजीसी शिष्यवृत्ती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपण सर्वांनी सरकारी स्तरावर उपलब्ध असलेल्या स्कॉलरशिपबद्दल बरंच काही ऐकलं असेल. तुम्हाला येणाऱ्या अडथळ्यांचीही जाणीव असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा शिष्यवृत्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यात कोणतीही अडचण नाही.
तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि कागदपत्रं अपलोड करावी लागतील. यानंतर, तुमची निवड झाल्यास पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतात. यामध्ये तुम्हाला कोणत्याही सरकारी बाबूला भेटण्याची किंवा कुणाच्या शिफारशीची गरज नाही.
देशातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या पातळीवर सातत्याने प्रयत्न करत आहेत. पण सरकारच्याही मर्यादा असतात. प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचत नाही. पण आज अशी अनेक अनेक व्यासपीठं आहेत, जिथं तुम्ही तुमची प्रतिभा सिद्ध करू शकता आणि आर्थिक मदत मिळवू शकता. असंच हे व्यासपीठ. जिथं विद्यार्थ्यांना वार्षिक 48 हजार रुपये म्हणजेच दरमहा 4 हजार रुपये मदत दिली जाते.
आता ही शिष्यवृत्ती देतं कोण तर देशातील सर्वात प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक असलेली इंडियन ऑइल. देशाच्या आर्थिक विकासात या कंपनीचे महत्त्वाचे योगदान आहे. ही नवरत्न कंपनी आहे. आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याचं नाव ओएनजीसी फाउंडेशन आहे. कंपनी हा ट्रस्ट तिच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीअंतर्गत चालवते. कंपनी आपल्या कोट्यवधी रुपयांच्या नफ्यातील काही भाग या फाउंडेशनला देते आणि या पैशातून फाऊंडेशन दरवर्षी गरजू मुलांना शिष्यवृत्ती देते.
कंपनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन श्रेणींमध्ये एकूण 2000 मुलांना शिष्यवृत्ती देणार आहे. सर्वप्रथम, SC-ST प्रवर्गातील 1000 हुशार मुलांना शिष्यवृत्ती दिली जाईल. ही शिष्यवृत्ती अभियांत्रिकी, एमबीबीएस, एमबीए आणि जिओलॉजी आणि जिओफिजिक्समध्ये मास्टर करणाऱ्या मुलांना उपलब्ध असेल . याअंतर्गत निवड झालेल्या मुलांना दरवर्षी 48 हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 50 टक्के शिष्यवृत्ती मुलींना दिली जाणार आहे.
यासाठी ओएनजीसीने संपूर्ण देशाची पाच झोनमध्ये विभागणी केली असून प्रत्येक झोनमधून 200 मुलांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाणार आहे . शिष्यवृत्तीबद्दल ओएनजीची स्वतंत्र वेबसाइट आहे www.ongcscholar.org . येथे सर्व काही तपशीलवार माहिती दिली आहे. अर्ज प्रक्रियेपासून आवश्यक कागदपत्रांपर्यंत सर्व काही स्पष्ट केले आहे.
कंपनीची ही योजना समाजातील प्रत्येक घटकातील गरीब घटकांसाठी आहे. दरवर्षी देशभरातून 2000 मुलांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. यात 1000 मुलं एससी आणि एसटी समाजातील आहेत. यानंतर सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातून 500, 500 मुलांची निवड केली जाते. यामध्ये 300-300 अभियांत्रिकीचे विद्यार्थी, 50-50 एमबीबीएसचे विद्यार्थी, 50-50 एमबीएचे विद्यार्थी आणि 50-50 जिओलॉजी-जिओफिजिक्समध्ये मास्टर्स करणारे विद्यार्थी निवडले जातील.
News Credit
News 18 लोकमत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा