डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

सुंदरकांड

 ।‌‌‍‍ सुंदरकांड ।

" श्रीराम चरित मानस " या ग्रंथाचा इतिहास हा अतिशय तेजस्वी आहे. या पवित्र ग्रंथाचा पारायणे करून अनेकांनी आपल्या मनःशांतीचा ठेवा सहजच प्राप्त करून घेतला आहे. काही व्यक्तीनां चांगल्या दर्जाचे आध्यात्मिक अनुभव त्यांना आलेले आहेतच,तसेच अनेकांचे संकटे दूर झाली आहेत. या ग्रंथातील प्रत्येक ओळ व शब्द मंत्र आहेत.



या ग्रंथातील असलेल्या सुंदरकांडात हनुमंताचा महिमा एकूण 60 दह्यात लिहिलेला असून आपल्या जीवनात येणारे संकटाचा सामना करण्यासाठी मंगळवार ते शनिवार असे पाच दिवसात या ग्रंथाचे एकूण 15 पाठ करावेत. ज्या वेळी संकट निवारणासाठी मानवी प्रयत्न कमी ठरतात त्यावेळी ते संकट दूर करण्यासाठी या सुंदरकांड पाठ करावेत असे अनेक तज्ञ व्यक्ती सांगतात.


सुंदरकांड या ग्रंथातील प्रत्येक दोहा म्हणजेच एक अतिशय चांगला सिध्द मंत्रच आहे. 

आपल्या रोजच्या जीवनात उद्भवणारे अनेक संकटावर मात करण्यासाठी या ग्रंथातील विशिष्ट दह्याचा पाठ करावा त्यामुळे आपले जीवन सुखकर होईल.


* लक्ष्मीप्राप्तीसाठी...

निज पद नयन लिए, मन राम पद कमल लीन। परम दुखी भा पवनसुत,देखिल जानकी दीन।।

वरील दोहा रोज सकाळी 121 वेळा म्हणावा, असे सलग 6 महिने या दोह्याचे पाठ केल्यास आपल्या जीवनात येणारे आर्थिक अडचणी दूर होतात.


* लांबलेला विवाहाचे लवकर योग येण्यासाठी...

कपि करि ह्रदय बिचार दिन्ही मुद्रिका डारी तब। जुन असोक अंगार दिन्ह हरषि उठ कर गहेउ।।

ज्यांचे विवाह काही कारणामुळे लांबले आहेत अंशांनी वरील दोहा दररोज सकाळी 51 वेळा म्हणावा व मारुतीचे दर्शन करावे त्यामुळे विवाहातील अडथळे दूर होतील व लवकर विवाह होईल. 


* कर्जमुक्तीसाठी....

पंछ बुझाई खोदू श्रम धरी लघु रुप बहोरी। जनकसुता के आगे ठाढ भयउ करजोरी।।

वरील दोहा दररोज सकाळी 151 वेळा म्हणावा त्यामुळे कार्यात येणारे विघ्न दुर होऊन उत्पन्नात वाट होईल त्यानुसार कर्ज लवकर फिटेल.  


दारिद्यनाशासाठी...

निमिष निमिष करूणा निधी जाही कलप सम बिती। बेमी चलिए प्रभु अनिऊ भुज बल खल दल जीति।।   

वरील दोहा मंगळवारी 21 वेळा, बुधवारी 41 वेळा,गुरूवारी 61 वेळा,शुक्रवारी 81 वेळा, शनिवारी 101 वेळा सकाळी म्हणावा 


* व्यापारवृध्दीसाठी..

एही विधी जाई कृपानिधी उतरे सागर तीर। जहॅ तहॅ लागे वान फळ भालु बिपुल 

कमिबीर।।

वरील दोहा सकाळी आपल्या दुकानात ऑफिस मध्ये हनुमंताच्या फोटो समोर बसून दररोज 151 वेळा करावा. 


* कार्यसिध्दिसाठी...

सचिव बैद गुर तीनि जौ प्रिय बोलहि भय आस।

राज धर्म तन तीनि कर होदू बेगिहीं नास।।

वरील दोहा दररोज सकाळी व संध्याकाळी 121 वेळा म्हणावा.


* स्वतःची वास्तु होण्यासाठी.....

सकल चरित तिन्ह देखे 

धरे कपट कपि देह। प्रभु गुन ह्दये सराहहि

सरनागत पर नेह।।

वरील दोहा शनिवार पासून सुरूवात करावी व 21 वेळा या दह्याचा पाठ करावेत.


वरील लेखन करण्यासाठी कांही पुस्तकांचा आधार घेतला आहे तसेच हे सर्व मोबाईलवर टाईप केले आहे ते करत असताना काही चुका झालेल्या आहेत त्या बद्दल क्षमा असावी हि विनंती तसेच सुंदरकांडाच्या पुस्तकं विकत आणावे व त्या पुस्तकातील वरील दोहा बघून म्हणण्यास सुरूवात करावी किंवा आपल्या गुरूजीकडून

समजून घेऊन वरील दोहे म्हणावे म्हणजे कांही चुक होणार नाही.

साभार

सोशल  मीडिया 

सूचना : 

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक