डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

काय आहे सोशल मीडिया एंग्जायटी?

 आजकाल सगळेच लोकं हे फोन आणि कम्प्युटरमध्ये व्यस्त असतात. कोणी काही काम करत असतं तर कोणी वेळ जाण्यासाठी टाईमपास म्हणून व्हिडीओ बघणं. याशिवाय आपले काही जवळचे लोक असतात ज्यांच्याशी आपण सोशल मीडियाच्या मदतीनं संपर्कात राहतो.

त्याशिवाय तुम्हाला माहितीये अनेक लोक हे सतत काहीही नसताना सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. त्यांना कंटाळ आला, ते आनंदात असले किंवा कोणत्याही गोष्टीतून बाहेर पडयाचं असेल तरी ते लगेच सोशल मीडियाचा वापर करतात. त्या लोकांमध्ये तुम्ही देखील आहात का? जे लोक काही नोटिफिकेशन आली की लगेच फोन चेक करतात? 

इन्स्टाग्रामवर गेल्या वर्षी एक नवं फिचर आलं होतं त्याचा वापर केल्यास तुम्ही तुमच्या पोस्टला असलेल्या लाइक्सचा नंबर लपवू शकतो. पण तुम्हाला माहितीये का की या फीचरला लॉन्च करण्यामागे इन्स्टाग्रामनं काय विचार केला असेल. दरम्यान, त्याच कारण आहे वाढती सोशल मीडिया एंग्जायटी डिसऑर्डरची वाढती संख्या. त्यामुळे इन्स्टाग्रामनं हे फीचर लॉन्च केलं आहे. मग आता तुम्हाला काही आठवतंय का की तुम्ही कधी फेसबूक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट किंवा कोणत्या सोशल मीडियाचा वापर केला? त्यावर तुमचं उत्तर हे मगाशीच असेल तर आणि तुम्ही देखील सोशल मीडिया एंग्जायटी डिसऑर्डरचे शिकार असू शकतात. 

काय आहे सोशल मीडिया एंग्जायटी?

1. सोशल मीडियावर इतरांच्या पोस्ट पाहिल्यानंतर त्याचे लाइक्स, व्ह्युज आणि शेअर्स पाहून चेंतत पडण?

2. सोशल मीडियाची पोस्ट पाहिल्यानंतर स्वत: ती त्या व्यक्तीशी तुलना करणं. 

3. सोशल मीडियावर ग्रो होण्यासाठी स्वत: ला मित्रांपासून आणि कुटुंबापासून लांब ठेवणं. 

4. आपण फॉलोवर्समध्ये मागे राहू या चिंतेनं किंवा आपले व्ह्यूज वाढतात की नाही याची चिंता करत सतत ते चेक करत राहणं. 

5. तुम्ही जे ही काम करत असाल त्यात तुमचं मन लागत नाही. ते सोडून तुम्ही सतत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चेक करत राहणं. 

6. सोशल मीडियामुळे कोणत्याही कामात लक्ष न लागणं.

 सोशल मीडिया एंग्जायटी कमी करण्यासाठी काय कराल? 

सोशल मीडिया एंग्जायटी कमी करण्यासाठी सगळ्यात आधी इन्स्टाग्राम, फेसबूक किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी लिमिट सेट करणं गरजेचं आहे. हे फक्त फोन आणि कॉम्प्युटरचा वापर कमी केल्यानं होतं नाही.यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही कोणत्या काऊंसिलरची मदत घ्या. त्यासोबत व्यायाम आणि आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलणं आणि भेटण्यानं कमी होईल.

News Credit:

Zee News 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक