पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाण्याला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. तहान भागवण्यापासून ते उपासनेपर्यंत धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. पंचतत्वावर आधारित वास्तुशास्त्रात पाण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मात पाणी अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. सनातन परंपरेत पाणी हे श्रीचे म्हणजेच माता लक्ष्मीचे किंवा दुसऱ्या शब्दांत संपत्तीचे प्रतीक मानलं गेलं आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार पाण्याचा मुख्यत: चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करुन तुम्ही तुमच्या कुंडलीतील चंद्र आणि शुक्र बलवान करु शकता. पण तुम्ही पाण्याचा अयोग्य वापर केल्यास चंद्र आणि शुक्र खराब स्थितीत येतात आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो.
पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात?
जेव्हा तुम्हाला व्यक्तितव्य मजबूत करायचं असेल तर सूर्यदेवाला पाणी अर्पण करायला हवं.
जेव्हा तुम्हाला भावनिकदृष्ट्या समतोल राखायचं असेल तर तुम्हाला शिवलिंगवर जल अर्पण करायच आहे. त्यामुळे तुमचा चंद्र मजबूत होतो.
जेव्हा तुम्हाला आयुष्यात शिस्त आणि सकारात्मक निकाल हवे असतील तर घरातील काम करणारी मंडळी, कुरिअर आणणारा माणूस इत्यादी लोक, जे तुम्हाला मदत करण्यासाठी येतात त्यांना त्यांना पाणी द्या.
जेव्हा तुम्हाला घरात सुख समृद्धी वाढवायची असेल तर तेव्हा गोड पाणी म्हणजे सरबतचं वाटप करावं.
जेव्हा तुम्हाला बुद्धीत वाढ करायची आहे, तेव्हा धार्मिक स्थळी म्हणजे मंदिर, मजिद, चर्च, गुरुद्वारा इथे लोकांना पाण्याचं वाटप करा.
जेव्हा तुम्हाला स्मरणशक्ती वाढ करायची आहे, तेव्हा तुम्ही झाडांना पाणी द्या.
जेव्हा तुम्हाला वाटतं आयुष्यातील संकट संपतच नाही आहे, अशावेळी गरीब लोकांना, गरजू लोक, रेड लाइट एरिया, हॉस्पिटल आणि वृद्धाश्रमात जाऊन पाण्याचं वाटप करा.
कुंडलीतील राहूचे दोष कमी करायचे असतील तेव्हा, आयुष्यात येणाऱ्या शुभ संधी गमवायची नसेल तर पक्ष्यांना पाणी द्या.
ज्या वेळी तुम्हाला वाटत आयुष्यात आता काहीच उरलं नाही आहे, अशावेळी केतूला मजबूत करण्यासाठी श्वानाला पाणी द्या.
अशाप्रकारे नऊ ग्रहांचा तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम देण्यासाठी पाण्याचा योग्य उपाय केल्यास ते तुमच्यासाठी वरदान ठरतं, असं डॉ. जया मदनने सांगितलं आहे.
News Credit:
Zee News
Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा