डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

अनोखे व्यक्तीमत्व

मित्रांनो ,आज फेसबुकवर मला देवा धर्माच्या गोष्टी या ग्रुप वर श्याम दुसाने यांची एक छान पोस्ट वाचण्यात आली तीच येथे देत आहे.

27वर्षात दहा बारा लाख कँन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्‍या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाही..

पण गेल्या 27वर्षात कँन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देव सापडला

तो हरखचंद सावला यांच्या रुपात,

मुंबईच्या परळ भागातुल प्रसिद्ध टाटा कँन्सर हाँस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहुन तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दिकडे टक लावुन पाहत राहायचा.

मृत्युच्या दारात उभा राहील्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्‍यावरील दिसणारी ती भीती,

त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्‍याने होणारी ती धावपळ पाहुन तो तरुण खुप अस्वस्थ व्हायचा

बहुसंख्य रुग्ण बाहेर गावाहुन आलेले गारीब लोक असायचे.कुठे कोणाला भेटायचे,काय करायचे हेही त्यांना ठाऊक नसायचे.

औषध पाण्यासाठी नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाहि पैसे नसायचे.

ते सार दृष्य पाहुन तो तरुण खिन्न मनाने घरी परतायचा..

आणि शेवटी याच तरुणाने एक मायेचे पाऊल उचलले..

त्याचे एक चांगल हाॅटेल भाड्याने देऊन त्याच पैशातुन त्याने त्या हाॅस्पिटलसमोर कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर एक यज्ञ सुरु केला जो पूढे 27वर्षे चालुच राहिला,

तेथील जनतेला सुद्धा हा ऊपक्रम आवडला आणि त्यांनीही हातभार लावला

ते एवढेही करुन थांबले नाही त्यांनी रुग्णांना मोफत औषध पुरवायलाही सुरवात केली.त्यासाठी त्यांनी औषधांची बँकच उघडली त्यासाठी तीन फार्मासिस्ट व तीन डाॅक्टर अन वर्कची टिमच त्यांनी स्थापन केली.

आज त्यांनी स्थापन केलेला जिवन ज्योत ट्रस्ट साठ हून अधिक उपक्रम राबवत आहे,

अशा या सत्तावन्न वर्षिय मा.हरखचंद सावला यांच्या कार्याला माझा शतशः प्रणाम।

साभार

श्याम दुसाने 

फेसबुक पोस्ट


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक