डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

डिपफेक तंत्रज्ञान माहिती

 डिपफेक हा एक बनावट व्हिडिओ किंवा फोटोचा प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्याचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने बदलला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे बनावट व्हिडिओ बनवले जातात.

डीपफेक व्हिडिओ हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडियाचा प्रकार असून असे डीपफेक व्हिडिओ इतके अचूक असतात की ते सहज ओळखू शकत नाही. डीपफेक व्हिडिओ मनोरंजन, शिक्षण आणि चुकीच्या माहितीसह, खोट्या बातम्या पसरविण्यासाठी वापरले जाऊ शकतात. 

काय आहे डीपफेक तंत्रज्ञान?

डीपफेक तंत्रज्ञान हे कृत्रिम बुद्धिमत्ताचा एक प्रकार असून त्याचा वापर लोक अशा गोष्टींसाठी करत आहेत जे ते प्रत्यक्षात कधीच करू शकले नसते. एखाद्या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओंचे मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचे स्वरूप आणि आवाज यांचे वास्तववादी मॉडेल तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग बनवली जाते. यालाच डीप सिंथेसिस तंत्रज्ञान म्हणतात. डीपफेक हे सखोल संश्लेषण तंत्रज्ञानातील सर्वात कुप्रसिद्ध प्रयोगांपैकी एक आहे.

डीपफेक तंत्रज्ञानोचे ताजे उदाहरण म्हणजे सिने अभिनेत्री रश्मिका मंदानाचा बनावट व्हिडिओ मात्र या आधी देखिल २०१७ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा असाच एक बनावट व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता ज्यात ते डोनाल्ड ट्रम्प यांना शिवीगाळ करताना दिसले, प्रत्यक्षात ते असे काही बोललेच नव्हते. सुरुवातीला या बनावट व्हिडिओला खरे मानले गेले आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. २०१८ मध्ये अभिनेत्री स्कारलेट जोहानसनचा एसाच एक बनावट व्हिडिओ समोर आला ज्यात त्या क्रिप्टोकरन्सीतील घोटाळ्याचा प्रचार करताना दिसली जो पर्यंत त्या व्हिडिओची सत्यता तपासली गेली तोपर्यंत लोकांचे पैसे बुडाले.

या तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे सर्वात मोठा धोका महिलांना आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अश्लिल व्हिडिओ बनवले जातात. राजकीय नेते एकमेकांच्या विरोधात डीपफेकला शस्त्र बनवू शकतात बनावट व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या मतात देखिल फेरफार करू शकतात. या शिवाय, चॅटबॉट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेव्दारे बनवलेली सामग्री मानवी आणि मशीन निर्मित सामग्रीमधील रेषा अस्पष्ट करते, त्यामुळे खरी आणि बनावट माहितीमध्ये फरक करणे कठीण होते.

सायबर तज्ज्ञ अमित दुबे यांनी डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या ॲप्लिकेशन आणि टूल्सवर नजर ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले. अशी सामग्री बनवणाऱ्याची माहिती देखील मध्यस्थ प्लॅटफर्मसने आपल्याकडे ठेवायला हवी. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता अधिक कडक कायद्याची गरज देखिल त्यांनी बोलून दाखवली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचे जाणकार सुमित शुक्ला यांनी सोशल मीडियावर वैयक्तिक खासकरून खासगीतले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करू नये असे सांगितले. प्रत्येकजण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे शक्यतो आपले प्रोफाईल खासगी ठेवावे आणि थोड्या दिवसात पासवर्ड चेंज करत राहावा.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनेच डीपफेक व्हिडिओ ओळखू शकतो. एआय ऑर नॉट आणि हाईव्ह मॉडरेशन सारखे ॲप्लिकेशन डीपफेक ओळखण्यासाठी वापरले जाऊ शकतात. हे अॅप्लिकेशन्स डीपफेक व्हिडिओ सहजपणे शोधून काढतात. याशिवाय डीपवेअर स्कॅनर, वीव्हेरिफाई, सेंटिनेल, मायक्रोसॉफ्टचे व्हिडिओ ऑथेंटिकेटर या टूल्सच्या मदतीने कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शोधता येतो.

प्रशांत शिरसाळे 

पुढारी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक