डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

पालकांनो, मुलं परीक्षेचा सतत ताण घेताय, चिडचिड करताय? कशी घ्याल काळजी?

 लवकरच मुलांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. काही मुलांच्या वार्षिक परीक्षा सुरु होतील. अशावेळी मुले परीक्षेचा अधिक ताण घेतात. ज्याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.



परीक्षेच्या काळात पालकांची मुलांबाबत काही वेगळी भूमिका असते. मुलांना चांगले मार्क्स मिळावे म्हणून पालक अधिक मागे लागतात. त्यामुळे मुलांचा (Child) अभ्यास नीटसा होत नाही. अभ्यासाच्या दबावामुळे मुले अधिक चिडचिड करु लागतात. अशावेळी पालकांनी अधिक शांत आणि संयमाने वागायला हवे. तसेच काही गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी. जाणून घेऊया पालकांनी काय काळजी घ्यायला हवी.

1. तुलना नको

बरेचदा पालक इतर मुलांशी आपल्या मुलांची तुलना करतात. ज्यामुळे त्यांची बौद्धिक पातळी, तार्किक क्षमता आणि गुण कमी होतात. आपल्या मुलांची त्यांच्या मित्रांशी, भावंडांशी किंवा त्याच्या वयाच्या इतर मुलांशी तुलना करु नका. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो. 

2. ब्रेकही महत्त्वाचा

दिवसभर अभ्यास करताना मुलांना कंटाळा देखील येतो. परीक्षेच्या (exam) काळात मुलांना नेहमी जास्त अभ्यास करावा लागतो. परंतु, या दरम्यान ब्रेक घेणे देखील जास्त गरजेचे आहे. यामुळे मुलांना फ्रेश वाटेल. पालकांनी अशावेळेस मुलांशी गप्पा मारायला हव्या किंवा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी किमान तासभर तरी करु द्यायला हव्या. 

3. विश्वास ठेवणे

अनेकदा पालक मुलांचा चांगला विचार करतात परंतु, त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. ज्यामुळे त्याच्या नात्यात दूरावा येतो. दोघांमधील अंतर वाढत जाते. यासाठी त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवा.

4. घरातील वातावरण

घरातील वातावरण चांगले असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील वातावरण अभ्यासासाठी अनुकूल आहे की, नाही हे देखील पाहा. घरातील वादविवाद मुलांसमोर आणू नका त्यामुळे त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो.

साभार

साम Tv



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक