डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

स्वार्थी मित्रांना असे ओळखणे, दूर राहण्यासाठी मदत होईल

 मैत्रीचे नाते खूप खास असते. मित्रच असतात ज्यामुळे आपण आयुष्यात आनंदी राहू शकतो. मित्रांसोबतच आपण आपल्या खाजगी गोष्टी देखील शेअर करतो. त्यांच्या सोबत मनमोकळेपणे हसू शकतो फक्त हेच नाहीतर गरज असतांना आपल्याला पहिले मित्रांचीच आठवण येते.



पण कधी कधी आपली मैत्री आशा लोकांशी होवून जाते जे केवळ त्यांच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत असतात म्हणजे स्वार्थासाठी मैत्री करतात. जेव्हा आपल्याला गरज असते किंवा आपण त्यांना एखादी मदत मागतो तेव्हा ते नाही म्हणतात. आणि आपण त्यांना काहीच बोलू शकत नाही आपण हा विचार करतो की आपण जर काही बोललो तर आपली मैत्री तुटून जाईल,त्यामुळे जरूरी आहे की वेळेत आशा मित्रांना ओळखा आणि त्यांच्या पासून अंतर ठेवा. 

फक्त स्वताचा विचार करणारा मित्र 

आपल्या सर्वांची भेट कधीना कधी आशा लोकांसोबत जरूर होते जे केवळ स्वताचा विचार करतात. आणि स्वतचे काम करवून घेण्यासाठी कुठल्यापण थराला जतात. ते प्रत्येक गोष्टीत स्वत:चा फायदा बघतात. तसेच दुसऱ्यांची मदत करतांना हाच विचार करतात की माझा फायदा कसा होईल. जर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये कोणी अस असेल तर जेवढ्या लवकर होईल तेवढे त्यांच्या पासून दूर रहाणे. कारण असे लोक कधीच कोणाची मदत करत नाही. व स्वत:चा स्वार्थ बघतात.

 बहाणा बनवायला सगळ्यात आधी 

काही लोक असे असतात जे फक्त मोठया मोठया गोष्टी करतात. तुम्ही त्यांच्याशी जेवढा वेळ बोलाल तेवढ तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांचे खास आहात आणि ते तुम्हाला जास्त महत्व देतात. जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा ते सगळ्यात आधी बहाणा बनवतात. तुमची मदत करेला नकार देतात. जर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये अस कोणी असेल तर वेळीच सावध होवून जा. 

महत्वाची माहिती गुपित ठेवण्यात कुशल

 जर तुमचा मित्र तुमच्या पासून महत्वाची गोष्ट लपवत असेल. किंवा तुम्हाला सांगायचे नसेल जेव्हा तुम्ही त्याला विचारतात तेव्हा ते म्हणतात की विसरून गेलो मी लक्षात राहिले नाही. या प्रकारे बहाणा बनवत असेल तर समजून जा की तो मित्र स्वार्थी आहे. तो तुम्हाला कधीपण धोका देवू शकतो.

गरज असतांना नेहमी जो धोका देतो 

जर तुम्हाला कुठल्यापण प्रकारची काही समस्या असेल तर आणि तुम्हाला एखाद्या मित्राची जास्त गरज असते आणि तो तुम्हाला प्रत्येक वेळी नकार देत असेल तर किंवा जाणून कुठलापण बहाणा बनवत असेल तर तुम्ही तय मित्रापासून दूर राहिलेले बरे. जर तो वारंवार असे करत असेल तर सावधान राहावे.

साभार

वेबदुनिया 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक