डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

CM Shinde : 20 हजार संगणक परिचालकांचे मासिक मानधन आता 10 हजार – मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रातील सुमारे 20 हजार संगणक परिचालकांकडून सातत्याने होणारी मानधनवाढीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करत दरमहा किमान 3 हजार वाढ देण्याचे निर्देश ग्रामाविकास विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 फेब्रुवारी रोजी जो संगणक परिचालक कंझ्युमेबल (पेपर रिम, प्रिंटर, टोणर इ.) चा खर्च स्वत: करेल, त्याला कंझ्युमेबलमधील रक्कम मानधन म्हणून वाढवण्याचा सीएससी-एसपीव्हीच्या सहमतीने विचार करा, या पर्यायाला सहमती दर्शवली आहे. सध्या 20 हजारहून संगणक परिचालक हे 34 जिल्ह्यांमधील 351 तालुक्यांमध्ये आपलं सरकारच्या सोयीसुविधा नागरिकांना देत आहेत. 


त्यानुसार कंझ्युमेबलसाठी सीएससी-एसपीव्ही कंपनीला प्रति केंद्र प्रति महिना अदा करण्यात येणारे किमान 2,700 रुपये ते कमाल 3 हजार रुपये यापुढे संगणक परिचालकांना अदा करण्यासाठी सहमती देण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने सीएससी-एसपीव्हीला दिले आहेत. कंपनीला प्रशिक्षणासाठी प्रती केंद्र मासिक 1300 रुपये देण्यात येतात. या रकमेतील जास्तीत जास्त रक्कम संगणक परिचालकांच्या मानधनासाठी उपयोगात आणण्यासाठी कंपनीसोबत बोलणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे संगणक परिचालकांचे मासिक मानधन आता 7 हजारांवरून थेट 10 हजार होणार असून ग्रामीण भागातील 20 हजार कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळेल. संगणक परिचालक यांना त्यांचे वाढीव मानधन 1 जानेवारी 2024 की 1 एप्रिल 2024 पासून मिळणार, याबाबतचा अजून निर्णय झाला नसल्याचे ग्रामविकास विभागातील एका अधिकाऱ्याने आपलं महानगरला सांगितले आहे.

News Credit
आपलं महानगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक