डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

बाबा रामदेव यांनी दिला परफेक्ट Diet Plan, फॉलो कराल तर अनेक आजारांपासून राहाल दूर



धावपळीच्या आयुष्यात योग्य फिटनेस आणि योग्य आहार हवा असेल तर यातून अनेकदा बरीच चांगली माहिती मिळते. आपण हल्ली कोणत्याही वेळी खातो आणि कोणतेही पदार्थ खातो. त्यामुळे अनेकदा आजारांना आमंत्रण देत असतो. पण कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीचे जेवण दैनंदिन आयुष्यात असायला हवे हे बाबा रामदेव यांच्याकडून घ्या जाणून.

ऋतुनुसार करावे खाण्यात बदल

आयुर्वेदात वेगवेगळ्या ऋतुनुसार खावे असं सांगण्यात आलं आहे आणि हेच बाबा रामदेवदेखील सांगतात. तसंच वात, पित्त प्रकृतीनुसार खाण्यात बदल करण्याची आवश्यकता असते. अन्यथा अनेक आजारांना सामोरे जावे लागएकचते. याची सर्वांना माहिती असते असंच नाही.

एकच नाश्ता कधीच करू नये​

सकाळच्या नाश्त्यामधील योग्य आहार काय असावा याबाबत बाबा रामदेव यांनी सांगितले की, सकाळचा नाश्ता हा कधीच एकच पदार्थाचा नसावा. नेहमी तोच तोच पदार्थ खाऊ नये. तर नाश्त्यामध्ये अंकुरित कडधान्याचा समावेश अवश्य करावा. यामधून लोह, प्रोटीन, कॅल्शियम उत्तम प्रमाणात मिळते. सर्वाधिक प्रोटीन मशरूम्स, डाळी, दूध, दही यामध्ये असते, त्यामुळे याचाही समावेश करून घ्यावा

जेवणामध्ये सर्व धान्याचा करा समावेश

रोज वेगवेगळ्या भाजी, पालेभाजी आणि वेगवेगळ्या धान्याच्या चपाती अथवा भाकरीचा समावेश हा दुपारच्या जेवणात अथवा रात्रीच्या जेवणामध्ये असावा. यामध्ये जवस, बाजरी, नाचणीची भाकरी असावी. केवळ गव्हाच्या चपाती रोज घाऊ नये. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा फायदा मिळतो. याशिवाय नेहमी जेवणात वेगवेगळ्या सलाडचा समावेश करा.

दिवसभरात २ चमचे तूप खावे

आहारामध्ये तुम्ही किमान २ चमचे तुपाचा समावेश करून घ्यावा. दोन चमच्यापेक्षा अधिक तूप खाल्ल्यावर अधिक चरबी शरीरामध्ये जमा होऊ शकते. रोज २० ग्रॅमपेक्षा अधिक फॅट शरीरामध्ये जाता कामा नये. मात्र तूप नियमित खाल्ल्याने त्वचा, केस आणि शरीराला फायदे मिळतात.

दूध, दही आणि ताक हे नियमित खावे

गॅस कमी करण्यासाठी, पोटातील जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही नियमित दूध,दही आणि ताकाचा आहारामध्ये समावेश करून घ्यावा. मात्र दुधासह विटामिन सी युक्त फळ खाऊ नयेत. दुधामध्ये सगळी फळं मिक्स करून फ्रूट सलाड बनविण्यात येते. मात्र हे आपल्या शरीरासाठी नुकसानदायी ठरते. रात्रीचे जेवण हलके असावे आणि जेवल्यानंतर एक तासाने दूध प्यावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक