डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

Flipkart आणि Amazonने बदलली `रिप्लेसमेंट पॉलिसी`, ग्राहकांना मनस्ताप

तुम्ही अ‍ॅमेझॉन (Amazon) किंवा फ्लिपकार्टसह (Flipkart) देशातील प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून वस्तू खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीत मोठे बदल केले आहेत. या पॉलिसीअंतर्गत जर तुम्ही खरेदी केलेली वस्तू खराब झाली असेल, तर तुम्ही ती ताबडतोब बदलू शकणार नाही, म्हणजे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून एखादी वस्तू विकत घेणे आणि ती बदलणे ही एक वेळकाढूपणा ठरणार आहे. नक्की काय बदलले आहे? जाणून घेऊया.
फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनने केले मोठे बदल
अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोनही कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल रिप्लेसमेंट पॉलिसीमध्ये (Replacement Policy) बदल केला आहे. या कंपन्यांनी 7 दिवसांत वस्तूंची देवाणघेवाण करण्याची योजना बंद केली आहे. याआधी या कंपन्यांकडून खराब झालेल्या किंवा सदोष वस्तू बदलून दिल्या जात होत्या. पण त्याऐवजी आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने ग्राहकांना संबंधित प्रोडक्टच्या सेवा केंद्रात (Service Centre) जाण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे एखाद प्रोडक्ट तुम्ही विकत घेतलं आणि त्यात काही दोष आढळला तर तुम्हाला सेवा केंद्रात चकरा माराव्या लागणार आहेत. 

वस्तूंची देवाणघेणार करता येणार नाही
ग्राहकांना यापुढे घरात बसून वस्तू आणि वस्तूंची देवाणघेवाण करण्याची सुविधा मिळणार नाही. अ‍ॅमेझॉनसह फ्लिपकार्टने हा नियम बदलल्याने ग्राहक सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. उत्पादन कमी दर्जाचे निघाले तर ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण सदोष वस्तू सात दिवसात बदलून देण्याचं धोरण बदललं असून या दोन्ही कपन्यांनी सात दिवसात सर्व्हिस सेंटरमध्ये वस्तू बदलण्याचा पर्याय दिला आहे. म्हणजे या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7 Days Replacement मध्ये बदल करत 7 Days Service Centre Replacement असा बदल केला आहे.

जर तुम्ही Amazon, Flipkart वरून डिजिटल वस्तू, उत्पादने, स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, इअरबड्स खरेदी करत असाल तर त्या प्रोडक्टशी संबंधीत जवळच्या सर्व्हिस सेंटरचीही माहिती घेऊन ठेवा. उत्पादन सदोष असल्याचे निष्पन्न झाल्यास, तुम्ही ताबडतोब सेवा केंद्रात (Service Centre) जाऊन त्याबद्दल तक्रार करू शकता आणि उत्पादन कधी मिळेल याची माहिती मिळवू शकता. मात्र या धोरणामुळे ग्राहकांचा वेळ तर जाणारच आहे, शिवाय नाहक मनस्तापही सहन करावा लागणार आहे.

News Credit:
zeenews.india.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक