डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

देशातील पहिलं रुग्णालय जिथं मोफत होणार IVF ट्रीटमेंट

दैनंदिन जीवन तणावपूर्ण होत आहे. त्यामुळे काही दाम्पत्य निपुत्रीक असतात. अशांना मुलबाळ व्हावीत, यासाठी आयव्हीएफ ट्रीटमेंट घेता येते. ही ट्रीटमेंट महागडी आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीला परतवडत नाही. 
ही ट्रीटमेंट घेण्यासाठी दाम्पत्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. 


आता ही ट्रीटमेंट राज्य शासन मोफत देणार आहे. गोवा देशातील असं पहीलं राज्य आहे जिथं आयव्हीएफ ट्रीटमेंट मोफत होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट रिप्रोडक्टीव्ह टेक्नॉलॉजी आणि आययूआय फॅसिटीली सुरू केली. गोवा मेडिकल कॉलेजच्या सुपर स्पेशॉलिटी ब्लॉकमध्ये १०० पॅरेंट्स या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, हेल्थ केअरमध्ये राज्य सरकारने मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे.

प्रत्येक वर्षी होणार ४ हजार ३०० डिलिव्हरी

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, विभाग नेहमी मेडकिल केअरचा बिझी सेंटर राहिला. दरवर्षी रुग्णांच्या गरजा पूर्ण करते. मेडिकल विभागात १९ हजार ओपीडी रुग्ण आहेत. दरवर्षी ४ हजार ३०० डिलिव्हरीज होतात. निपुत्रीक दाम्पत्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

रुग्णांकडून घेतले जाणार नाही पैसे

आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, देशातला हा असा एक मोफत रुग्णालय आहे जिथं आयव्हीएफ उपचार होतील. रुग्णांकडून पैसे घेतले जाणार नाही. सीएसआरच्या माध्यमातून पैसे येतील. राणे म्हणाले, निपुत्रीक दाम्पत्य उपचारासाठी बाहेरच्या राज्यात जातात. आयव्हीएफ उपचारासाठी लोकं पुणे किंवा कोल्हापूरला जातात.

सीएसआर फंडमधून खर्च होणार

आरोग्य मंत्री म्हणाले, रुग्णालयाला कार्पोरेट सोशल रिस्पान्सिबीलीटी (सीएसआर) फंडमध्ये कोट्यवधी रुपये मिळाले. या पैशाचा उपयोग उपकरण खरेदीसाठी केला जात आहे. आम्ही सर्वोत्तम सुविधा प्रदान करणार आहोत. ही सुविधा गोवा सरकारने दिल्यामुळे निपुत्रीक दाम्पत्यांना मोठा फायदा होणार आहे. मुलबाळ होण्याचं सुख त्यांना तांत्रिक पद्धतीने मिळणार आहे. १०० जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यानंतर पुन्हा अॅडव्हान्स बुकिंग सुरू करावी लागणार आहे.

News Credit:
Govinda Hatwar 
tv9marathi.com



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक