डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

Online Gaming Safety Tips

 भारतात गेमिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ शहरांमध्येच नाही, तर छोट्या गावांमध्येही कित्येक गेमर्स तयार होत आहेत. मात्र, याचाच फायदा काही सायबर गुन्हेगार देखील घेत आहेत.



स्मार्टफोन गेमर्सना पैसे कमावण्याचं आमिष दाखवून त्यांना काही लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात येतं. यानंतर यूजर्सचा सर्व डेटा, त्यांचं गेमिंग अकाउंट आणि पर्यायाने त्यात असणारे पैसेदेखील हॅकर्सच्या ताब्यात जातात. कित्येक प्रकरणांमध्ये यूजर्सचे बँक डीटेल्स चोरीला जाऊन मोठी फसवणूक झाल्याचंही समोर आलं आहे. यामुळेच सरकारने गेमर्सना काही टिप्सही दिल्या आहेत.

ऑनलाईन गेमर्सना टिप्स

1) कोणत्याही ऑनलाईन गेमला केवळ अधिकृत वेबसाईट, गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन डाऊनलोड करा.

2) ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या गेमची वेबसाईट आणि पब्लिशर याबाबत माहिती घ्या.

3) कोणतेही अ‍ॅप सुरू केल्यानंतर ते आपल्या मोबाईलमधील काही गोष्टींचा अ‍ॅक्सेस मागते. अशा वेळी केवळ त्याच गोष्टींचा अ‍ॅक्सेस द्या ज्या गेमिंगसाठी गरजेच्या आहेत.

4) गेमिंग अ‍ॅप खरेदी करताना योग्य लिंकवर क्लिक केलं आहे याची खातरजमा करा. कित्येक वेळा नकली सबस्क्रिप्शन लिंकवर क्लिक केलं जाऊन फसवणूक होऊ शकते.

5) ऑनलाईन मल्टिप्लेअर गेम्स खेळताना समोरच्या अनोळखी प्लेअरसोबत चॅट करताना आपली खासगी माहिती त्यांना देऊ नका.

साभार

सकाळ 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक