भारीच! थेट 17000 हजारांनी स्वस्त झाला Samsung चा 5G फोन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लवकरच Samsung Galaxy S24 FE 5G लॉन्च करू शकतो, अशी चर्चा आहे. मात्र नवीन मॉडेल येण्यापूर्वी जुने मॉडेल हजारो रुपयांच्या सवलतीसह ग्राहकांसाठी उपलब्ध झालं आहे.
आम्ही ज्या मॉडेलबद्दल बोलत आहोत, ते आहे Samsung Galaxy S21 FE 5G.
कंपनीने मागील वर्षी जुलैमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह हा स्मार्टफोन पुन्हा लॉन्च केला होता. लॉन्चच्या वेळी याची किंमत 50 हजार रुपये होती. मात्र आता हा फोन किमी किंमतीत उपलब्ध झाला आहे.
सेलशिवाय हा फोन थेट 17,000 रुपयांनी झाला स्वस्त
येथे आम्ही तुम्हाला फोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंटवर उपलब्ध डीलबद्दल सांगत आहोत. लॉन्चच्या वेळी याची किंमत 49,999 रुपये होती. हा फोन ग्रेफाइट, लॅव्हेंडर, ऑलिव्ह, व्हाइट आणि ब्लू या पाच रंग प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण या फोनचा ऑलिव्ह कलर व्हेरिएंट Amazon वर फक्त 32,995 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच याच्या लॉन्च किंमतीपेक्षा 17,004 रुपये कमी आहे.
मात्र ही ऑफर इथेच संपत नाही. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही याची किंमत आणखी कमी करू शकता. यातच हाच व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 33,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर अधिकृत वेबसाइटवर 39,999 रुपयांना उपलब्ध आहे.
फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस सेफ्टीसह 6.4-इंचाचा AMOLED 2X डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
फोनमध्ये स्टँडर्ड 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 12-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 8-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी, यात 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
News Credit:
साम Tv
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा