आँनलाईन जगात आपली मुलं सांभाळा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सायबर ट्रेनर मुक्ता चैतन्य यांचा एक लेख डेली हंट या सोशल मीडियावर वाचण्यात आला, त्या मध्ये त्यांनी सोशल मीडिया वर असणारे, गेमिंग किंवा चाटींग करणारे लहान किंवा किशोरवयीन मुलं/मुली कश्या प्रकारे सायबर गुन्ह्यातील सायबर गृमिंग या प्रकारात अडकतात यांची माहिती दिली आहे.
पालकांसाठी हा खास लेख येथे देत आहे.
सायबर गुन्ह्यातील सायबर गृमिंग हा प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे आणि हा प्रकार कुठल्याही वयातल्या मुलं-मुली कुणाही बरोबर होऊ शकतो.
सोशल मीडियावर, गेमिंग प्लॅटफॉर्मवर अनोळखी लोकांची ओळख होते. मैत्री होते. दर वेळी आपण ज्या अनोळखी लोकांच्या संपर्कात येऊ ते खरे असतीलच असं नाही. ऑनलाईन जगात अनेक लोक खोटी नावं आणि प्रोफाईल्ससह फिरत असतात. त्यात गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचाही समावेश असतोच. ही माणसं करतात काय तर जाणीवपूर्णक टिनेजर्सच्या संपर्कात येतात. त्यांच्याशी छान मैत्री करतात. मैत्री करुन विश्वास संपादन करतात. मुलांचा पूर्ण विश्वास जोवर तयार होत नाही तोवर ते कसलीही अवाजवी मागणी करत नाहीत. वाह्यात पद्धतीने बोलत-लिहीत नाहीत. काहीही चुकीचं शेअर करत नाहीत. त्यामुळे टीनएजर्सना त्या चॅटिंगमध्ये काहीच धोका वाटत नाही. जेव्हा विश्वासाचं नातं तयार होतं त्यानंतर मग हे गुन्हेगार टिनेजर्सना जाळ्यात अडकवायला सुरुवात करतात. त्यात स्वतःचे न्यूड फोटो/व्हिडीओ पाठव अशी मागणी असते. काहीवेळा घरच्यांच्या बँकेचे किंवा इतर काही खासगी माहिती देण्यासाठी दबाव असतो. आणि हे गुन्हेगार जे सांगतील ते केलं नाही तर फोटो/व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. अनेकदा प्रेमाच्या, डेटिंगच्या नात्यातही न्यूड फोटोंची देवाण घेवाण होते आणि ब्रेकअप नंतर ते फोटो रागाच्या भरात व्हायरल होतात.
सायबर गृमिंग करणारे जाणीवपूर्वक लैंगिकतेबद्दलच्या मुलांच्या मनातल्या संवेदनशीलता मारून टाकतात. ही प्रक्रिया दीर्घकाळ आणि हळूहळू केली जाते.
दीर्घकाळ मैत्री असल्याने आपल्याकडे जी मागणी झालेली आहे ती अवास्तव आहे हे त्या मुलं/मुलीच्या लक्षातच येत नाही.
इतकं मुलं/मुलीच्या मनाचं आणि विचारांचं कंडिशनिंग झालेलं असतं.
या गोष्टी आपल्या मुलांच्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या.
१) सायबर जगतात सायबर गृमिंग करणारी लोकं असतात याची माहिती मुलांना द्या.
२) अनोळखी लोकांशी मैत्री करताना सावधानता बाळगायला सांगा.
३) अनोळखी लोकांशी परिचय झाला तरी कुठलीही खासगी माहिती कधीही शेअर करायची नाही हे सांगा.
४) अनेकदा मुलांकडून न्यूड्सची मागणी केली जाते, अशी कुठलीही मागणी झाली तर लगेच मोठ्यांना कुणाला तरी सांगितलं पाहिजे हे मुलांना माहित असायला हवा. तो विश्वास मोठ्यांविषयी वाटायला हवा.
५) तेरा वर्षांच्या खालची मुलं सोशल मीडियावर नाही ना हे चेक करा. आठ, दहा, तेरा-चौदा वर्षांची मुलं गेमिंग करताना कुणाच्या संपर्कात आहेत याविषयी मुलांशी बोला. पालक आणि मुलं यांच्यात संवाद असेल तर मुलं सगळ्या गोष्टी येऊन पालकांना सांगतात आणि त्यातून आपली मुलं सुरक्षित आहेत की धोक्यात याचा अंदाज पालकांना येऊ शकतो.
साभार
मुक्ता चैतन्य
डेली हंट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या

Very useful information for kids and every parents thank u 👍 🙏
उत्तर द्याहटवा