डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

केंद्र सरकारच्या पाच योजना

 केंद्र आणि राज्य सरकार सामान्य नागरिकांचं जीवन सुलभ व्हावं, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत मिळावी म्हणून अनेक योजना राबवत असते. यातच आज आपण केंद्र सरकारच्या अशाच पाच योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.



1. सुकन्या समृद्धी योजना :

पैशांअभावी आपल्या मुलांना शिक्षण देऊ न शकलेल्या कुटुंबांच्या, विशेषत: मुलींच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली.देशातील मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी जानेवारी 2015 मध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चासाठी पैसे वाचवू शकता. 

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावर उघडले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात मॅच्युर होते. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर या खात्यातून अभ्यासासाठी पैसे काढता येतात. मात्र संपूर्ण रक्कम 21 वर्षानंतरच काढता येते.


2. उज्ज्वला योजना:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे ही योजना सुरू केली.

जे लोक कोळसा, झाड्याच्या फांद्या इत्यादी पारंपारिक स्वयंपाक इंधन वापरत होते त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना सरकारने सांगितले की, पारंपरिक स्वयंपाकाच्या इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही घातक परिणाम होतात. यासाठीही योजना सुरु करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकता.


3. पीएम किसान सन्मान निधी:

या योजनेचा लाभ अल्प व अत्यल्प शेतकरी कुटुंबांना (ज्यांना दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे) मिळतो. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना सरकार दरवर्षी सहा हजार रुपये देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.


4. आयुष्मान भारत

ही आरोग्य विमा योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गरीब वर्गातील कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो. गरीब बीपीएल कार्डधारकांना मोफत उपचार मिळावेत हा यामागचा उद्देश आहे. देशभरात अशी बीपीएल कार्ड धारक गरीब कुटुंबांची संख्या सुमारे 10 कोटी आहे. तर 50 कोटी लोक याचा लाभ घेऊ शकतील.


5. प्रधानमंत्री आवास योजना:

ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. या अंतर्गत ज्या लोकांकडे कच्ची घरे आहेत, ज्यांना छप्पर नाही, ते पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत गरिबांना घरे बांधण्यासाठी पैसे दिले जातात. याशिवाय कमी उत्पन्न असलेल्यांना गृहकर्ज अनुदानही दिले जाते. 25 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक