डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

केवायसी घोटाळा म्हणजे काय? फसवणूक होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी?

 केवायसी घोटाळा म्हणजे काय?

वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाते. आपले नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच संबंधित बँकेच्या तपशीलाचा वापर करतात. या माहितीच्या आधारे गैर व्यवहार करतात, अनधिकृत खाती उघडतात आणि खाती हॅक करून त्याचा गैरवापर करतात.

स्कॅमर कॉल, इमेलवर बँकिंग अधिकाऱ्यांची नक्कल करून संबंधित व्यक्तींना माहिती विचारतात. याशिवाय मेसेजवर केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर क्लिक करून अपडेट करण्यास सांगतात. जर आपण त्या लिंकवर क्लिक केले तर आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.


केवायसी फसवणूक होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी?


  1. वैयक्तिक माहितीविषयी काळजी घ्या – तुमची संवेदनशील माहिती ऑनलाइन किंवा फोनवर शेअर करणे टाळा. अनोळखी कॉलरबरोबर आणि अज्ञात वेबसाइटवर माहिती शेअर करू नका. वैध वित्तीय संस्था क्वचितच तुम्हाला ईमेलवर किंवा फोनवर पिन, पासवर्ड विषयी माहिती विचारतात.
  2. डिजिटल व्यवहार सुरक्षित करा – तुमच्या सर्व खात्यांसाठी चांगला आणि कठीण पासवर्ड तयार करा ज्यामुळे तुम्ही सुरक्षितरित्या डिजिटल व्यव्हार करू शकता.शक्य असेल तिथे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करा ज्यामुळे तुमचे खाते लगेच हॅक होऊ शकत नाही. त्यासाठी दोन प्रकारची ओळख आवश्यक असते. मोबाईल किंवा लॅपटॉप सुरक्षित ठेवा.
  3. कोणत्याही ऑनलाईन गोष्टींचा वापर करण्यापूर्वी माहिती तपासा – कोणतेही अॅप किंवा ऑनलाईन कोणत्याही गोष्टींचा वापर करण्यापूर्वी त्याबाबतील पडताळणी करा आणि माहिती तपासा. वेबसाइट किंवा अॅपविषयी जाणून घ्या अन्यथा फसवणूक होऊ शकते.
  4. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा – तुमचे बँक स्टेटमेंट, क्रेडिट कार्ड बिल, इत्यादी आर्थिक व्यवहारांवर नीट लक्ष ठेवा. जर तुम्हाला कोणतीही बाब संशयास्पद किंवा अनधिकृत वाटली तर त्या संदर्भात संबंधित संस्थेला कळवा.
  5. सावध राहा – डिजिटल व्यवहार करताना नवीन घोटाळे किंवा फसवणूकीच्या प्रकरणांविषयी जाणून घ्या आणि त्यापासून सावध राहा. सायबर धोका ओळखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी जास्तीत जास्त नवीन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
  6. संशयास्पद गोष्टीची तक्रार करा- तुम्हाला डिजिटल व्यव्हार करताना एखादी गोष्ट संशयास्पद वाटली किंवा वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक खात्यांशी संबंधित गैरव्यव्हार होत असल्याचा संशय आला तर संबंधित वित्तीय संस्था आणि अधिकाऱ्याला कळवा.
  7. याशिवाय पासवर्ड नियमितपणे बदलणे, ऑनलाईन कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिलॉकर वापरणे, सार्वजनिक वायफाय वापरू नये, पडताळणीशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, इत्यादी काळजी घेणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक