डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

तुम्हाला बोटं मोडण्याची सवय आहे का? आत्ताच सोडा, अन्यथा वाढेल 'या' आजाराचा धोका!

घरात लहान मुलं बोटं मोडत असतील तर मोठी माणसं त्यांना 'अशी बोटं मोडू नयेत, ही चांगली सवय नाही,' अशी सक्त ताकीद देतात. बऱ्याचदा बोटं मोडणं म्हणजे एखाद्याचं वाईट चिंतणं असं मानलं जातं.



त्यामुळे लहान मुलांना बोटं मोडताना मोठी माणसं ओरडतात. पण बोटं मोडणं ही सवय चांगली नाही, असं डॉक्टर्स मानतात. इतकंच नाही तर या संदर्भात संशोधनं झाली असून, त्यातही ही सवय वाईट असल्याचंच म्हटलं आहे. 

काही जणांना वारंवार बोटं मोडण्याची सवय असते. काहीजण सवयीमुळे वारंवार बोटं मोडतात, तर काही जण मात्र कंटाळा आला किंवा फावल्या वेळात हाताची बोट मोडताना दिसतात. बोटं मोडल्यानंतर काहींना अत्यंत आरामदायी वाटतं. पण ही सवय चांगली नाही, कारण यामुळे हाडांचं नुकसान होतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

डॉक्टरांच्या मते, वारंवार बोटं मोडल्याने हाडांवर त्याचे वाईट परिणाम होतात. यामुळे हाडं कमकुवत होऊ शकतात आणि काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे बोटं मोडण्याची सवय सोडून द्यायला हवी. आपल्या बोटांच्या, गुडघ्यांच्या आणि कोपराच्या सांध्यांमध्ये एक खास लिक्विड असतं. याचं नाव Synovial Fluid असं आहे. हे लिक्विड आपल्या हाडांना एकमेकांशी घर्षण होण्यापासून वाचवतो. हे लिक्विड हाडांमध्ये एक प्रकारचं ग्रिसिंग म्हणून काम करतं. हाडांच्या हालचालीसाठी ते आवश्यक असतं.

हाडातील गॅस लिक्विड असलेल्या ठिकाणी बुडबुडे तयार होतात, त्यामुळे जेव्हा आपण बोटं मोडतो, तेव्हा ते बुडबुडे फुटतात आणि आवाज येतो. सतत बोटं मोडल्याने हाडांमधील हे सायनोव्हियल फ्लुईड लिक्विड कमी होऊ लागतं. काही लोक वारंवार बोटं मोडतात, मात्र वारंवार अशी बोट मोडल्यानं बोटांवर ताण येतो आणि बोटांच्या दोन हाडांच्या सांध्यांमध्ये असणाऱ्या सायनोव्हियल फ्लुईडवर परिणाम होतो. त्यामुळे काही काळानंतर हाडं सतत घासल्यामुळे संधिवात होऊ शकतो, असा दावा काही अभ्यासांमध्ये करण्यात आला आहे.

आज तक' नेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वारंवार बोटं मोडल्याने दोन हाडांमधील पकड कमकुवत होते. यामुळे तुम्हाला अर्थ्रायटिसदेखील होऊ शकतो. काही रिसर्चर्सच्या मते वारंवार बोटं मोडल्याने निगेटिव्ह प्रेशर तयार होतं, त्यामुळेच बोटं मोडल्यावर आवाज येतो. बऱ्याचदा बोटांमध्ये वेदना होतात आणि सूजही येते. भविष्यात यामुळे संधिवात होऊ शकतो.

News Credit

News 18 लोकमत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक