डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

लठ्ठपणा आजार व नियंत्रण

हल्ली तासन् तास जागेवरुन न हलता काम केलं जातं. दिवसभर झोप घेतली जाते आणि रात्रीचं जागून शरीराला त्रास देऊन काम केलं जातं. अशा सध्याच्या जीवनशैलीत लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.



आपल्या जीवनशैलीत ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी , ताण तणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोकांना लठ्ठपणाचा त्रास सहन कराव लागत आहे. तसेच विशिष्ट प्रकारच्या औषधांचे सेवन केल्याने तुमचे वजन जास्त होण्याचा धोका असतो. तुम्ही डिप्रेसेंट्स, स्टिरॉइड्स, एंटी-सीजर औषधे, मधुमेहाची औषधे आणि बीटा-ब्लॉकर्स घेतल्यास, तुम्हाला साइड-इफेक्ट्स देखील होऊ शकतो. जर तुम्ही ही औषधे घेत असाल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लठ्ठपणा हे शंभर आजारांचे मूळ आहे, अशी जुनी म्हण आहे. हे खरे आहे की, लठ्ठपणा वेळीच नाहीसा केला नाही तर तो अनेक घातक आजारांना आमंत्रण देऊ शकतो , चला तर मग आपण लठ्ठपणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबाबत माहिती घेऊयात


टाइप 2 मधुमेह

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी शरीर ज्या प्रकारे इन्सुलिन वापरतो त्यावर लठ्ठपणा परिणाम करू शकतो. यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि मधुमेहाचा धोका वाढतो, विशेषत: टाइप 2 मधुमेह. लठ्ठपणा हे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. गेल्या काही वर्षांत फास्ट फूड किंवा जंक फूड खाण्याचा ट्रेंड अथवा प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा वाढत आहे. फास्ट फूड खाण्याच्या या सवयीमुळे अनेकांना लहान वयातच मधुमेह झाल्याचे दिसून येत आहेत. वजन वाढल्याने मुलांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. टाईप- 2 मधुमेहामुळे मुलांची किडनी आणि यकृतावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे काही वेळा लहान वयातच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.


लठ्ठपणामुळे हृदयविकार 

लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब आणि असामान्य कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. यामुळे उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल, कमी एचडीएल कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्सची उच्च पातळी असण्याची शक्यता वाढते. याला डिस्लिपिडेमिया देखील म्हणतात. हृदयविकार आणि स्ट्रोकसाठी हे सर्व जोखीम घटक आहेत.


लैंगिक इच्छा संपते

लठ्ठपणाचा थेट संबंध हार्मोनल असंतुलनाशी असतो. हे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करते. यामुळे लैंगिक इच्छा संपुष्टात येऊ शकते. अनेक रिसर्च आणि संशोधनात हे अधोरेखित झाले आहे. 


ऑस्टियोआर्थराइटिसचा धोका वाढतो 

जास्त वजन असलेल्या महिलांमध्ये गुडघ्याच्या ऑस्टियोआर्थरायटिसचा धोका अंदाजे 4 पट जास्त असतो. जास्त वजन असलेल्या पुरुषांसाठी धोका 5 पट वाढतो. बेली फॅटमुळे सांध्यांवर यांत्रिक ताण वाढून शरीरात दीर्घकाळ जळजळ होण्याचा धोकाही वाढतो. ही जुनाट जळजळ संधिवात आणि इतर विकारांना उत्तेजन देऊ शकते.

लठ्ठपणावर असे ठेवा नियंत्रण

– फास्ट फूड अथवा जंक फूडचे सेवन करू नये.

– लहान मुलांना बाहेर जाऊन (मैदानावर) खेळण्यास प्रोत्साहित करावे.

– सर्वांनीच दिवसभरात कमीत कमी अर्धा तास तरी कोणताही व्यायाम जरूर करावा.

– डाएट करत असाल तर आहारात फॅटचे प्रमाण कमी करावे आणि प्रोटीन्स व व्हिटॅमिन्सचे सेवन अधिक करावे.

– डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही औषधाचे सेवन करू नये.

जागतिक लठ्ठपणा फेडरेशनने केलेल्या अलीकडील संशोधनानुसार, निरोगी वजनाच्या लोकांच्या तुलनेत जास्त वजन असलेल्या लोकसंख्येमध्ये मृत्यूचा धोका 22% जास्त असतो. लठ्ठ लोकांमध्ये हा धोका दुपटीने वाढतो.


डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.


 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक