'अशी' काळजी घेतली तरच ई-बाईक बॅटरी टिकेल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पेट्रोलचे दर (Petrol Price) गगनाला भिडले आहेत. दुसऱ्या बाजूला पर्यावरण संवर्धनासाठी 'ई-बाईक्स'चा वापर गेल्या काही वर्षांत वाढला आहे.
मिरज औद्योगिक वसाहतीतील योगटेक कंपनीचे (Yogtech Company) संचालक चिन्मय गोरे यांनी सांगितलेली माहिती अशी की, श्री. गोरे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी. बी. टेक. नंतर त्यांनी एमबीए केले. त्यानंतर त्यांनी प्राधान्याने बॅटरीविषयी अभ्यास सुरू केला. त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये त्यांनी मिरज औद्योगिक वसाहतीत योगटेक नावाची कंपनी सुरू केली. बॅटरी बनवणारी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव कंपनी आहे. दुचाकीसाठी लागणाऱ्या बॅटरींविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ''इलेक्ट्रिक दुचाकीत आता शासनाच्या नियमानुसार लिथियम-आयनच्या बॅटरी वापरल्या जातात. त्या कमी जागा व्यापणाऱ्या व वजनाने हलक्या असतात. त्यामुळे त्यांचा वापर केला जातो. शासनाने 'एआयएस-१५६' निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार ही बॅटरी बनवली जाते. त्याचे साधारणतः सात ते आठ वर्षे आयुष्य असते. वेळच्या वेळी देखभाल केली तर बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होते. साधारणतः ३० ते ८० हजारांपर्यंत या बॅटरीच्या किमती आहेत. बॅटरीत आता तापमान संतुलनासह व्यवस्थापन तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. त्यामुळे पूर्वी थर्मल रन बॅटरीचे स्फोट व्हायचे, मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे ९९ टक्के बॅटरीचा स्फोट होत नाही.''
कशी दक्षता घ्याल...?
- निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक वापर करू नका
- चार्जिंग नेहमी केले पाहिजे
- बॅटरी डिस्चार्ज होता कामा नये
- वेळच्या वेळी देखभाल-दुरुस्ती झाली पाहिजे
- बॅटरी मेंटनन्स सिस्टिमचा योग्य वापर झाला पाहिजे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा