डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

इयरफोनचा अतिवापर करत असाल तर सावधान, 'या' आजारांना पडू शकता बळी



आज-काल अनेक लोक अशी आहेत.ज्यांना गाणी ऐकायला खूप आवडतात. अगदी क्वचितच अशी माणसं असतील त्यांना गाणी आवडत नाही. ही गाणी ऐकताना , पिक्चर बघताना तसेच व्हिडिओ पाहताना आपण नेहमीच इयरफोनचा वापर करायला लागलेला आहोत.

तो आवश्यक देखील आहे. कारण आपल्याला आजूबाजूच्या लोकांचा त्रास होत नाही आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे बोलणे किंवा गाणी अगदी नीट ऐकू येते. परंतु तुम्हाला माहित आहेत का? या इयरफोनचे जसे चांगले फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणाम (Earphone Side Effects) देखील आहेत. आज आपण ईअरफोन वापरल्यामुळे आपल्या आरोग्याला काय हानी पोहोचू शकते हे जाणून घेणार आहोत.

मोठ्या प्रमाणात जर तुम्ही इयरफोन (Earphone Side Effects)मधून गाणी ऐकत असाल किंवा व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्या कंपनामुळे कानांच्या नसावर दबाव येतो. त्यामुळे शिरा फुगतात आणि हळूहळू तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते. तुम्ही जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर तुम्ही बहिरे होऊ शकतात.

  • कानात शिट्टीचा आवाज येणे
  • कमी ऐकायला येणे
  • चक्कर येणे
  • डोकेदुखी
  • कान दुखणे
  • चिडचिड होणे
तुम्ही जर सातत्याने इयरफोन वापरत असाल तर तुमच्या कानात घाण साचते आणि त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते. दुसऱ्याचे इयरफोन वापरल्याने देखील तुम्हाला इन्फेक्शन होते.

इयरफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो त्याचप्रमाणे कधी कधी मायग्रेन सही त्रास होतो.

आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत इयरफोन वापरत असाल, तर कानावर नाही तर तुमच्या हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके नेहमी उच्च राहतात आणि तुम्हाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. (Earphone Side Effects)

हेडफोनच्या सततच्या वापरामुळे लोकांमध्ये तणाव आणि चिडचिडेपणा दिसून येतो त्यामुळे त्यांची शारीरिक स्वास्थ देखील बिघडते.

  • इअरफोनचा आवाज कमी ठेवा.
  • बराच वेळ वापरू नका.
  • तुमचे इअरफोन कोणाला देऊ नका किंवा दुसऱ्याचे इअरफोन वापरू नका. यामुळे संसर्गाचा धोका होऊ शकतो.
  • नेहमी चांगल्या दर्जाचे इअरफोन वापरा.
  • कानांसोबतच वेळोवेळी इअरफोन्सही स्वच्छ करणे गरजेचे आहे.
  • झोपताना इअरफोन वापरणे टाळा.
  • ब्लूटूथ चार्ज करताना अजिबात वापरू नका.
News Credit:
Hello महाराष्ट्र 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक