डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

महिलांचा आरोग्य विमा काढणे का आवश्यक आहे?

 आपण अशा काळात जगत आहोत जिथे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते आणि चर्चा केली जाते. स्तनाचा कर्करोग, ऑस्टिओपोरोसिस आणि गरोदरपणातील समस्यांसारखे आजार गंभीरपणे लक्ष देण्याची आणि दर्जेदार आरोग्यसेवेची मागणी करतात.

महिला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात असल्या तरी आज त्यांच्या सर्वांगीण विकासासोबत आरोग्याची काळजी घेण्याची जास्त गरज आहे. या 'जागतिक महिला दिनानिमित्त' (International Women's Day )आज आपण महिलांसाठी 'आरोग्य विमा'का महत्त्वाचा आहे ते जाणून घेणार आहोत.

आरोग्य विमा का काढला पाहिजे?

हेल्थ पॉलिसी किंवा आरोग्य विमा गंभीर आजार झाल्यास रुग्णालयाच्या खर्चाची पूर्तता करण्यास मदत करते. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी नैराश्य आणि अनेक आर्थिक समस्यांपासून ते तुम्हाला वाचवते. म्हणजेच हेल्थ पॉलिसी किंवा आरोग्य विमा तुम्हाला अडचणीच्या काळात मदत करू शकते. यामुळे तुम्हाला कोणतेही महागडे उपचार घेण्यासाठी आर्थिक बळजबरीचा सामना करावा लागणार नाही.

वाढती महागाई आणि गंभीर आरोग्य समस्यांशी संबंधित सेवा पाहता, कोणत्याही कुटुंबासाठी हेल्थ पॉलिसी किंवा आरोग्य विमा आवश्यक आहे. साधारणपणे, कोणत्याही गंभीर आजाराच्या वेळी, तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त पैसे खर्च होतात आणि तुमच्याकडे तेवढे पैसे नसतात, परंतु तुम्ही हेल्थ पॉलिसी किंवा आरोग्य विमा घेतला असेल तर तो तुमची अर्धी आर्थिक समस्या सोडवू शकतो.


महिलांनी आरोग्य विमा का काढला पाहिजे?


मातृत्वाची गरज

अनेक आरोग्य विमा कंपन्या मातृत्वासाठी चांगल्या सवलतीचा आरोग्य विमा देतात. अशा प्रसूती योजनांमध्ये प्रसूतीसाठी हॉस्पिटलायझेशन तसेच नवजात बाळाची काळजी, डॉक्टरांची फी, फॉलो-अप अपॉयमेंट इत्यादी सारख्या संपूर्ण कव्हरेजसह हॉस्पिटलायझेशनचा समावेश होतो. यामुळे खाजगी रुग्णालय उपचार करणे अत्यंत सोयीस्कर होते.


स्त्रियांच्या प्रजनन समस्या

पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर (PCOD), गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग इत्यादीसारख्या स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीशी संबंधित समस्या जगभरातील लाखो स्त्रियांना प्रभावित करत आहेत. अशा परिस्थीत महिलांचा आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. महागडे उपचार करताना तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.


मानसिक आरोग्य समस्या

मनोवैज्ञानिक विकार आणि मानसिक आजारांवर उपचार करण्याचे महत्त्व उघडपणे बोलण्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्त्रिया तणाव, नैराश्य आणि चिंताग्रस्त असतात ज्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. आता मानसिक आजारांवर उपचारांसाठी हेल्थ कव्हरेज मिळणे शक्य झाले आहे. पण तुम्ही जेव्हाही आरोग्य विमा काढत असाल तेव्हा त्यामध्ये या आजारावर मदत मिळणार की नाही ते तापसून घ्यावे.


वृद्धत्वामुळे येणाऱ्या आरोग्य समस्या

बदलत्या जीवनशैलीनुसार आजार वाढत आहेत ज्यांचा परिणाम अनेक तरुण महिलांवर होत आहे. थायरॉईड विकार, मूत्रमार्गाच्या समस्या आणि हार्मोनल समस्या या मुख्य आरोग्यविषयक समस्या विशेषत: महिलांमध्ये आढळून येतात. महिलांचे वय वाढत असतानाच आरोग्याचे धोके वाढतात. यामध्ये मोतीबिंदू, ऑस्टिओपोरोसिस, मधुमेह, संधिवात आणि हृदयरोग यांचा समावेश आहे. वयोवृद्ध महिलांनी देखील औषधांसोबतच नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृद्ध सदस्य असलेल्या कुटुंबासाठी, ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजनांची शिफारस केली जाते. या योजना हॉस्पिटलायझेशन, हॉस्पिटलायझेशनपूर्व आणि नंतरचे वैद्यकीय खर्च आणि रुग्णवाहिका शुल्क यासारख्या खर्चांसाठी मदत देतात.

आरोग्य विमा घेताना...

सर्वसमावेशक कव्हरेजः आरोग्य विमा घेताना सर्व आवश्यक तपासण्या करून घेतल्या जातील; त्याचबरोबर सर्व आजारही समाविष्ट करून घेतले जातील. तसेच, क्लेम सेटलमेंट त्वरित उपलब्ध होईल आणि प्रतीक्षा कालावधी (waiting period) कमी असेल, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे असते.

मॅमोग्राम, पॅप स्मिअर यांसारख्या तपासण्या नियमित केल्यामुळे आजारांचे निदान लवकर होण्यात व त्यावर योग्य उपचार करण्यात मदत होईल. हॉस्पिटलमधील खोली भाड्यासाठी (रूम रेंट) मर्यादा नसेल, अशी पॉलिसी निवडा.

प्रसुती आरोग्य विमाः प्रसुतीच्या वेळी, प्रसुतीच्या आधी आणि नंतरच्या चाचण्या व औषधे यांचा समावेश आहे ना, याची खात्री करावी. फर्टिलिटी कव्हर घेताना इनव्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) कव्हर करणारी पॉलिसी असावी.

जुन्या व्याधींसाठी विमाः जुन्या व्याधी, आजार कव्हर करणारी पॉलिसीसुद्धा महिलांना घेता येते. काही कंपन्या जुना आजार असलेल्या महिलांनादेखील आरोग्य विमा प्रदान करतात. मात्र, त्यांना कमीत कमी २ ते ४ वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असतो. विशेषतः कर्करोग, मधुमेह असलेल्या महिलांना

(pre-existing deceases) प्रतीक्षा कालावधी असलेली आरोग्य विमा योजना घेता येते.

चांगल्या रुग्णालयांचा समावेशः पॉलिसी निवडताना त्यात चांगली रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश, रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा आहे ना, याची खात्री करून घ्या.

येत्या महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी स्वतःपासून आरोग्य विमा घेण्याची सुरुवात करावी. स्वतःचा आणि कुटुंबाचाही आरोग्य विमा काढावा, याचा नक्कीच फायदा होतो.

आरोग्य विम्याचे फायदे

१. आरोग्यासाठी नियमित लागणाऱ्या खर्चात कपात करण्याची संधी

२. प्रसूतीच्या वेळेला मिळणारे फायदे

३. गंभीर आजारांमध्ये होणारी आर्थिक मदत

४. करवजावटीचा लाभ घेता येतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० डी अंतर्गत आरोग्य विम्यासाठी करवजावट मिळते.

५. कॅशलेस कव्हर

६. प्रतिबंधात्मक काळजी व पुढील काळात होणाऱ्या खर्चावरही नियंत्रण राहू शकते.


महिलांसाठी काही सर्वोत्तम योजना

१. केअर जॉय

२. स्टार वूमन केअर प्लॅन

३. एचडीएफसी ऑर्गो मेरी स्वास्थ्य महिला सुरक्षा

४. चोलामंडलम सर्व शक्ती योजना







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक