डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

चक्षू पोर्टलमुळे सायबर गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई होईल

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सायबर गुन्हेगार पोहोचू नयेत यासाठी सरकारने चक्षू पोर्टल आणले आहे.



या Cyber crime पोर्टलवर संशयास्पद कॉल्स आणि नको असलेल्या कॉल्सच्या तक्रारी केल्या जाऊ शकतात, यानंतर सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर आता तात्काळ कारवाई होणार, अशी माहिती दूरसंचार विभागाचे उपमहासंचालक राजेंद्र मेश्राम यांनी दिली. केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते चक्षू आणि डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म चक्षूचा लाँचिंग कार्यक्रम नवी दिल्ली येथे ऑनाइन पध्दतीने झाला. 


दूरसंचार विभागाने चक्षू हे नवीन पोर्टल आज लाँचिंग केले असून दूरसंचार नेटवर्कमधील फसवणुकीबाबत ग्राहक थेट तक्रार करू शकतील. हे पोर्टल सुरू झाल्यामुळे संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यास या पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. मुख्यत: डिजिटल जगात वेगाने वाढणारे सायबर गुन्हे थांबवण्यासाठी सातत्याने नवनवीन नियम लागू केल्या जात आहे. दूरसंचार नेटवर्कवरील फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकार संचार साथी पोर्टलवर 'चक्षू' हे पोर्टल सुरू केल्यामुळे Cyber crime सायबर फसवणुकीवर नियंत्रण आणता येईल,

चक्षू लॉन्च झाल्यामुळे सायबर फसवणूक रोखण्यास मदत होणार असून बनावट क्रमांकांना आळा बसणार आहे

News Credit:

तरुण भारत, नागपूर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक