डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

वैद्यकीय शिक्षण ते ही निःशुल्क,कुठे? ते जाणून घ्या.

आजच्या काळात आपल्या भारतात डॉक्टर होणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलं नाही. कारण वैद्यकीय क्षेत्रातील संबंधित शिक्षणचा खर्च दिवसेंदिवस महाग होत आहे. लाखो रुपयांची ट्युशन फी, होस्टेलचा खर्च, अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च हा खूपच मोठा असतो.



भारतातमध्ये सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची फी 10 लाख रुपयांपर्यंत आहे. तर, खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ही फी 60 लाख रुपयांपर्यंत आहे. या शिवाय, शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागणाऱ्या खर्चाचा हिशेब सहजासहजी करता येणार नाही.

पण अमेरिकेतील एका मेडिकल कॉलेज ने तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. ट्युशन फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून एक रुपया घेणार नसल्याचं कॉलेजनं जाहीर केलंय. 

बीबीसीच्या बातमीनुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये हे कॉलेज असून, त्याचे नाव अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीन आहे. या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला दरवर्षी 59 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 48 लाख 87 हजार रुपये ट्युशन फी भरावी लागते. अनेक विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन ही फी भरतात; पण आता कॉलेजच्या प्रशासनाने येथील विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ करण्याचा निर्णय घेतलाय.

विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ करण्याचं कारण म्हणजे या कॉलेजला तब्बल 1 अब्ज डॉलर्सची देणगी मिळाली आहे. वॉल स्ट्रीटमधील गुंतवणूकदार डेव्हिड सँडी गॉट्समन यांचं नुकतंच निधन झालं. गॉट्समन यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला होता. ही रक्कम गॉट्समन यांची पत्नी व ब्रोंक्स स्कूलमधील माजी शिक्षिका डॉ.रुथ गॉट्समन यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनला एक अब्ज डॉलर्सची देणगी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या रकमेतून कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ट्युशन फी भरून त्यांना मोफत शिक्षण द्यावं, अशी विनंतीही त्यांनी कॉलेजला केली. त्यानंतर कॉलेजनं विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

एखाद्या शैक्षणिक संस्थेला मिळालेली ही सर्वांत मोठी देणगी आहे.

अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीन कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला असणारे 50 टक्के विद्यार्थी न्यूयॉर्कमधील असून, त्यापैकी 60 टक्के मुली आहेत. 29 टक्के विद्यार्थी भारत, चीन, जपानसह अनेक आशियाई देशांमधून आले आहेत. सुमारे 16 टक्के विद्यार्थी आफ्रिकन आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक