रेल्वे ची महिला प्रवाशां च्यां सुरेक्षेसाठी विशेष योजना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अनेकदा आपण रेल्वे प्रवास दरम्यान एकट्या महिला सुरक्षित नसल्याचे बघितले असेल पण आता घाबरून जाण्याचे कारण नाही .
यातच देशभरात रेल्वे प्रवासा दरम्यान महिला सुरक्षेसाठी मोदी सरकारकडून एक योजना राबविली जात आहे. त्या योजनेचे नाव ‘मेरी सहेली योजना’ असे असून त्याबाबतची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मेरी सहेली योजना :
या योजनेअंतर्गत रेल्वे प्रवासा दरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास मेरी सहेली योजनेअंतर्गत महिला तक्रार करू शकतात. विशेषत: रेल्वेत एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना ही योजना फायद्याची ठरणार आहे.
मेरी सहेली योजनेच्या टीममध्ये फक्त महिलांचा समावेश असेल. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला विशेष सुरक्षा मिळेल. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची काळजी फक्त महिलाच घेतील. ही टीम एकटीने प्रवास करणाऱ्या महिलेला ती कुठे जात आहे? कोणी तिचा छळ करत आहे का? तुम्हाला ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत आहे का? याबाबतची माहिती विचारु शकते.
त्यामुळे आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांना काळजी करण्याची गरज नाही. मेरी सहेली योजना ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची ओळख करून देईल आणि त्यांना विशेष संरक्षण देईल. याशिवाय त्या महिलांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. महिला प्रवाशांना प्रत्येक स्थानकावर वेगवेगळी टीम मिळेल.या योजनेनुसार, कोणत्याही कारवाईसाठी रेल्वे स्थानकांवर आरपीएसएफ एस्कॉर्ट कर्मचारी आणि आरपीएफ उपस्थित राहतील.
महिला प्रवाशांना ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्या टोल फ्री क्रमांक 182 वर तक्रार करू शकतात. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण किंवा गैरसोय झाल्यास या क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो. सप्टेंबर 2020 मध्ये हा उपक्रम दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये सुरू करण्यात आला. ज्यामध्ये महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती. सध्या ही योजना महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.
महिलांसाठी रेल्वे च्या इतर सुविधा
यासोबतच महिलांना ट्रेनमध्ये विविध सोई देखील पुराव्याला जातात. देशातील एक्सप्रेस रेल्वेमध्ये अनारक्षित क्षेणीतील महिलांसाठी स्वतंत्र डबा राखीव असतो. या व्यतिरिक्त १५० किमी पर्यंतचे कमी अंतर पार करणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसाठी वेगळे डबे किंवा कोच हे राखीव असतात.
तसेच भारतीय रेल्वेकडून महिलांसाठी खास विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जातात. जर तुम्ही गरोदर असाल आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला मधला किंवा वरचा बर्थ देण्यात आला असेल तर, तुम्ही बर्थ एक्सचेंज करू शकता. रेल्वेतील बर्थ एकसचेंज करण्याचा महिलांना अधिकार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा