डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

महिलांना व्यवसायात आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्त्री शक्ती योजना

आजचा जमाना हा स्टार्टअपचा आहे. या स्टार्टअपच्या जमान्यात महिलांचाही विविध प्रकारच्या स्टार्टअप्स उभारणीत मोलाचा वाटा आहे. कोणताही व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल हवेच. त्यामुळेच केंद्र सरकारने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅक असलेल्या स्टेट बॅक आँफ इंडियासोबत ‘स्त्री शक्ती योजना’ आणलीय. 



महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत: काहीतरी केले पाहिजे, यासाठीच स्त्री शक्ती पॅकेज योजना सुरू करण्यात आली. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत महिलांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. जेणेकरून देशातील महिला उद्योजकांची संख्या आणखी वाढेल.

महिलांना स्वावलंबी आणि सशक्त करण्यासाठी स्त्री शक्ती पॅकेज योजना सुरू करण्यात आली. जेणेकरून महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करून पुढे जाऊ शकतील.

स्त्री शक्ती पॅकेज योजनेत किती कर्ज उपलब्ध आहे


केंद्र सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत महिला जास्तीत जास्त २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये बँकेच्या काही निकषांची पूर्तता करावी लागते. त्यात प्रामुख्याने, कर्ज घेणाऱ्या महिलेची त्या व्यवसायात किमान ५० टक्के मालकी असावी.


योजनेतील सवलत आणि तरतूदी


- दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या महिलांसाठी व्याजदर ०.५% ने कमी केला जाईल. 

- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील नोंदणीकृत कंपन्यांसाठी कर्ज मर्यादा ५० हजारांवरून २५ लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

- स्त्री शक्ती पॅकेज योजनेत फक्त पाच टक्के किंवा त्याहून कमी दराने व्याज आकारले जाईल.

- पाच लाखांपर्यंतचे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा हमी देण्याची गरज नाही.

- स्त्री शक्ती पॅकेज योजनेत या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांची संख्या वाढत आहे.


 ही कागदपत्रे आवश्यक असतील

- स्त्री शक्ती पॅकेज योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे.

आधार कार्ड,

- मतदार ओळखपत्र,

- बँक खाते तपशील,

- ई - मेल आयडी,

- मोबाईल नंबर,

- व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे.

- जेव्हा एखादी कंपनी कर्जासाठी अर्ज करते तेव्हा त्यात महिलांची मालकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असावी.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक